नांदेड – महेंद्र गायकवाड
शहरातील श्री. गुरु गोविंदसिंघजी विमानतळावर उद्या अति महत्वाच्या व्यक्तीचे आगमन होणार असून त्या अति महत्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षा कारणाने नांदेड पोलिसांनी नागरिकांना ड्रोन कॅमेरा व ड्रोन सदृश्य वस्तु उडविण्यास प्रतिबंध केले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात नांदेड जिल्हयातील नागरीकांना नांदेड पोलीसांकडुन आवाहन करण्यात आले आहे की, दिनांक 23.12.2024 रोजी अतिमहत्वाची व्यक्ती, हे नांदेड जिल्हयाचे दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने दिनांक 23.12.2024 रोजी, विमानतळ परिसर,
नांदेड शहरामध्ये नागरीकांनी पत्रकारानी, इतर कोणीही कोणत्याही सबबीखाली परवानगीशिवाय “ड्रोन’ कॅमेरा, ड्रोन सदृश्य वस्तु व हवेत उडविल्या जाणाऱ्या मानवनिर्मीत वस्तु आकाशामध्ये उडवणार नाही. याची सर्व नागरीकांनी दक्षता घ्यावी. कोणत्याही नागरीकांनी आदेशाचे उल्लंघन केल्यास संबधीतावर कायदेशिर कारवाई करण्यात येणार असल्याचा ईशारा पोलिसांनी दिला आहे