गावरान हातभट्टीची दारू बंद करण्यासाठी महिलांनी पातुर पोलीस सात दिलेनिवेदन…
पातुर – निशांत गवई
पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्रामीण भागातील शेकापूर आणि खापरखेड येथे गावरान हातभट्टीची दारू मोठ्या प्रमाणात काढली जात असून त्याची विक्री सुद्धा मोठ्या प्रमाणात होत असून सदरची दारू तात्काळ बंद करावी शेकापूर खापरखेड येथे गावरान हातभट्टी ची दारू काढणारे इंदल दशरथ राठोड, कली बाई कसंनदास राठोड,
प्रेमदास दशरथ राठोड ,चेतन ताराचंद राठोड, गोपाल मांगीलाल चव्हाण ,राम जगदेव राठोड ,भीमराव मेघा राठोड हे सहा ते सात जण या गावांमध्ये गावरान हातभट्टीची दारू सर्रास काढून अवैध विक्री करत आहे सदर प्रकारामुळे गावातील युवक व्यसनाच्या आहारी जात आहेत गावरान हातभट्टीच्या दारूच्या आहारी गेल्यामुळे किती कुटुंबाचे जीवन उध्वस्त झाले आहे.
पातुर पोलिसात सदर प्रकाराबाबत यापूर्वी निवेदन आणि तक्रारी दिलया आहेत मात्र काहीच कारवाई झाली नाही मात्र शेकापूर खापरखेड येथील गावरान हातभट्टीची दारू बंद करावी अशी मागणी महिलांनी पातुर पोलिसात दिलेल्या निवेदनातून केली आहे.