दानापूर – गोपाल विरघट
शाषनाच्या नियमांचे पालन करून संपुर्ण देश भर स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला.भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाले व त्या पार्श्वभूमीवर हर, घर तिरंगा अमृतमहोत्सवाचे आयोजन 13, 14, 15 या तारखेला करण्यात आले होते.
यावेळी गावातून पारंपरिक ढोलच्या , व सांप्रदायिक भजनाच्या माध्यमातून गावातून प्रभात फेरी काढण्यात आली, यामध्ये भारत मातेच्या प्रतिमेला पालखीत बसवण्यात आले होते सोबतच लहान चिमुकल्यांनी विविध वेशभूषा यावेळी केल्या होत्या जिल्हा परिषद शाळा मुले, कन्या, व हनुमान प्रसाद साह जनता विघालयांच्या विद्यार्थीनी प्रभात फेरीत सहभाग नोंदवला.
यावेळी विविध ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला सर्वप्रथम ग्रामपंचायत भवन येथे सरपंच सौ, सपना वाकोडे, जिल्हा परिषद शाळा मुले श्री.विश्वेश्वर पातुर्डे, जिल्हा परिषद कन्या शाळा, येथे कु. नयना कळंबे मॅडम, तलाठी कार्यालय येथे श्री.अंकुश मानकर, हनुमान प्रसाद साह जनता विद्यालय येथे वर्ग 9 मध्ये प्रथम आलेला विद्यार्थी अभिजित शिवलाल बोरसे, पशु वैद्यकीय दवाखाना येथे प्रेस क्लबचे अध्यक्ष सुनिलकुमार धुरडे,
प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषद सदस्य गजानन काकड, विजवीतरण कंपनी येथे श्री.गजानन तायडे, अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक येथे सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष कैलास रौदळे, नारायणी देवी साह महाविद्यालयात भोजराज पालिवाल, बुलढाणा अर्बन बँक श्री, छागानी साहेब, 33KVउपकेंद्र येथे सिनियर ऑपरेट जायभाये यांनी केले.
यावेळी उपसरपंच, ग्रामसेवक , ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका , बचतगट सदस्या , व गावातील विविध संस्थाचे पदाधिकारी, पत्रकार ,प्रतिष्ठित नागरिक ध्वजारोहण ला उपस्थित होते.