Sunday, December 22, 2024
Homeराज्यमहाराष्ट्र दिनावर आमदार आशिष जयस्वाल यांचे हस्ते ध्वजावंदन...

महाराष्ट्र दिनावर आमदार आशिष जयस्वाल यांचे हस्ते ध्वजावंदन…

रामटेक – राजू कापसे

रामटेक तहसील कार्यालय येथे महाराष्ट्र दिवस 1 मे ला आमदार आशिष जयस्वाल यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, उपविभागिय अधीकारी वंदना सवरंगपते, पंचायत समिती सभापती चंद्रकांत कोडवते, पोलिस उपविभागीय अधिकारी रमेश बरकते, तहसीलदार रमेश कोळपे, पोलिस निरीक्षक प्रशांत काळे,

बिडीओ जयसिंग जाधव, मुख्याधिकारी पल्लवी राउत, नायब तहसीलदार महेश कुलदिवार, नायब तहसीलदार भोजराज बडवाईक, नायब तहसीलदार मुकुंद भूरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता किरण पोकळे सहित शहरातील मान्यवर उपस्थित होते.

समर्थ विद्यालयच्या विद्यार्थी यानी बँडवर राष्ट्रगीत धून वाजवली व पोलिस विभाग तर्फे मानवंदना देण्यात आली. अशोक भिलकर यांच्या मुलगा सैन्य मध्ये कार्यरत असताना मृतु झाला. त्याबदल अशोक भीलकर व त्यांच्या पत्नीला विरपीता वे विरमाता म्हणून शाल श्रीफळ देवून मान्यवरांच्या हस्ते गौरवन्यात झाले.रामटेक नगरपरिषद येथे उपविभागिय अधीकारी वंदना स्वरंगपते यांचा हस्ते ध्वजारोहण करन्यात आले. संचालन प्रकाश उके यानी केले.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: