अमरावती शहरात खुलेआम अमलीपदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची शहरात चर्चा सुरु असतांना काल गुन्हे शाखा युनिट क्रं. ०१ यांनी जबरदस्त कारवाई करत शहरातील गुलीस्ता नगर येथील अहसान खान याच्या घरावर छापा टाकला असता त्याच्या घरातून ४० ग्रॅम एम. डी. नावाचा अमलीपदार्थ व पाच मोठ्या तलवारी व एक फरशा जप्त केल्या आहेत. पोलीस आयुक्त श्री नवीनचंद्र रेडडी सर यानी अमरावती शहरामध्ये अमलीपदार्थ बाळगणारे, विकणारे तसेच सेवन करणा-या लोकांविरूदध धडक मोहीम राबवीण्याबाबत आदेशीत केले होते.
पोलीस आयुक्त यांचे आदेशान्वये गुन्हे शाखा युनिट क्रं. ०१ चे अधिकारी व अमंलदार हे नागपूरी गेट भागात पेटोलींग करत असताना गुप्त बातमीदाराकडून माहीती प्राप्त झाली की इसम नामे अहसान खान हसन खान वय अंदाजे २० ते २५ वर्श रा. ग्यासुद्दीन हॉस्पीटलजवळ, गुलीस्तानगर, अमरावती हा आपल्या ताब्यात एमडी नावाचा अंमली पदार्थ बाळगुन असुन आपल्या घरातुन लोकांना एमडी या अंमली पदार्थाची विक्री करीत आहे.
सदर माहीती वरिष्ठ अधिकारी याना देवून सदर माहीती खात्रीशरी असल्याने अंमली पदार्थ विरुदध कायदयाचे तंतोतंत पालन करून पंचासमक्ष व स्टाफ सह आरोपी अहसान खान हसन खान याचे राहते घरी गुलीस्ता नगर येथे रेड केली असता तो पोलीसाना पाहून पळून गेला त्याचे राहते घरी त्याचे वडील नामे हसन खान खाजे खान वय ५३ वर्ष रा गुलीस्ता नगर हे घरी मिळून आल्याने पंचासमक्ष त्यांचे घराची झडती घेतली असता त्यांचे घरून १ ) एम.डी नावाचा अमली पदार्थ वजन ४० ग्रॅम अदांजे मुल्य १,२०,०००रु २) मोजमाप करण्यासाठी वापरात येत असतलेला इलेक्टॉनीक वजन काटा अंदाजे मुल्य १००० रु ३) प्लॉस्टीक चे रिकामे पाउच मिळून आले. तसेच सदर आरोपी हा रेकॉर्डवरिल शरीराविरूदध चे गुन्हे करणारा असल्याने त्यांचे सपूर्ण घराची झडती घेतली असता त्याचे घरातून लोखंडी कपाटावरून मोठ्या पाच तलवारी व एक फरशा असे एकून सहा लोखडी तलवारी व फरशा मिळून आले त्यांचे अंदाजेत मुल्य १०,००० रु. आरोपी याचे घरून अंमली पदार्थ तलवारी व फरशा असा एकून १,३१,००० रु चा मुददेमाल मिळून आल्याने तो पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे. ताब्यात असलेला आरोपी नामे हसन खान वल्द खाजे खान वय ५३ वर्ष रा गुलीस्ता नगर याना सदर अमलीपदार्थ व तलवारी बाबत विचारणा केली असता तो माल व तलवारी त्याचा मुलगा नामे अहसान खान वल्द हसन खान वय २२ वर्ष रा गुलीस्ता नगर अमरावती याचा असल्याचे सांगून तो कधी कधीच मूलाच्या घरी राहत असतो तो इतर वेळी दूसरी कडे राहत असल्याचे सांगीतले आहे.
सदर घटनेबाबत कायदेशीर कार्यवाही करून आरोपी व मुददेमाल पुढील तपासासंबधाने पोलीस स्टेशन नागपूरी गेट यांचेकडे देण्यात आला आहे. सदर गुन्हाचा पुढील तपास नागपूरी गेट पोलीस स्टेशन करत आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, नवीनचन्द्र रेडडी सर, मा. पोलीस उपआयुक्त गणेश शिंदे सर. (मुख्यालय), मा. पोलीस उपआयुक्त सागर पाटील सर, मा. सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) शिवाजी बचाटे सर, मा. सहायक पोलीस आयुक्त कैलास पुंडकर सर, गाडगे नगर विभाग यांचे मार्गदर्शना खाली युनिटकं. ०१ चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक गोरखनाथ जाधव, सपोनि मनीष वाकोडे, सपोनि योगेश इंगळे पोहवा राजू आपा, फिरोज खॉन, नाईक पोलीस अमंलदार दिनेश नांदे, विकास गुडदे, पोलीस अमलदार सुरजचव्हाण, निखील गेडाम, निवृत्ती काकड, अमोल मनोहरे चालक अलीमउददीन खतीब, अमोल बहादरपूरे, रोशन माहुरे, किशांर खेंगरे यानी केलेली आहे.