रस्ता दुरुस्त न झाल्यास नागरिकांनी दिला आंदोलनाचा इशारा…
पातुर – निशांत गवई
पातुर येथील शिर्ला ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या राधे नगर, बंजारा कॉलनी व सौ कलाबाई गहिलोत नगरमध्ये पावसाच्या पहिल्या सरी कोसळतात रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. येथील रस्त्यांवर एवढा चिखल साचला आहे की नागरिक रस्त्यावर पाऊल सुद्धा ठेऊ शकत नाही.
येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी मागील तीन वर्षापासून ग्रामपंचायत, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद सदस्य ,आदींना लेखी व तोंडी स्वरूपाच्या वारंवार सूचना दिल्या परंतु आतापर्यंत एकाही लोकप्रतिनिधींनी येथे असलेले माती व मुरूमाचे कच्चे रस्ते सिमेंट किंवा डांबरी करण्याची तसदी घेतलेली नाही.सद्यस्थीतीत रस्त्यांची दुरावस्था एवढी झाली आहे की दुचाकी अथवा चार चाकी गाडीने तर सोडाच तर नागरिक दहा पाऊल सुद्धा पुढे जाऊ शकणार नाही.
रस्त्याच्या अशा दुरावस्तीमुळे दरवर्षी पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शाळेला दांडी मारावी लागते याचे वाईट परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शिक्षणावर होते. येथील नागरिकांनी तारेवरची कसरत करत चप्पल बूट हातात घेऊन चालावे लागते एखाद्या वेळी वैद्यकीय मदत म्हणून ॲम्ब्युलन्स च्या सेवेचा लाभ न मिळाल्याने रूग्णांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येतो एकीकडे इतर ठिकाणी रस्ते पे रस्ता असे काँक्रिटीकरण केले जाते, परंतु येथील नागरिकांनी संबंधित लोकप्रतिनीधींना व प्रशासनाला लेखी,तोंडी स्वरूपाच्या सूचना वारंवार देऊन सुद्धा येथील कच्चे रस्ते पक्क्या स्वरूपाचे बनवण्याची आतापर्यंत तसदी घेतली नाही ही फार मोठी शोकांतीका आहे. अशी बिकट व भयावह दुरावस्थेने येथील रहिवाशी असलेल्या नागरिकांनी या भागातील रस्ता तात्काळ दुरुस्त न केल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.