पातूर – निशांत गवई
पातूर येथूनच जवळ असलेल्या दिग्रस खुर्द येथील नवरदेव ने भावाच्या मुलीला पोलिओचा डोस देऊन त्यांनतर लग्न लावण्यास वरती सह निघुन गेला असल्याचे दिसून आले आहे. याबाबत परिसरात नवरदेवाचे कौतुक वर्षाव होताना दिसून आला आहे.
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने ‘दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी’ हे घोषवाक्य घेऊन रविवार ३ मार्च २०२४ रोजी संपूर्ण राज्यात पोलिओ लसीकरण मोहीम राबविली आहे.
या दिवशी ग्रामीण व भागातील ५ वर्षापर्यंतच्या बालकांना लसीकरण केंद्रावरून पोलिओची लस दिली जाणार होती.लग्नाच्या गडबडीत भाऊ व वहिनी तयारी दंग होते परंतु भावाची मुलगी पोलिओ लसीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेत दिग्रस खुर्द येथील नवरदेव स्वतः तयारी करून मुलीला घेऊन अविनाश इंगळे याने स्थानिक अंगणवाडी मध्ये नेऊन लसीकरणाचे दोन थेंब करून घेतले आहे.
या वेळी अंगणवाडी कर्मचारी निरुताई वेलकर व समून चिकटे यांनी सुद्धा उल्हासात दोन थेंब देऊन लसीकरण करून घेतले.परिसरात नवरदेवाची हाती बाळ पाहून सर्व कौतुक करीत होते..