Monday, December 23, 2024
Homeराजकीयबसवकल्याण मध्ये ४ व ५ मार्चला पहिले राष्ट्रीय लिंगायत महाअधिवेशन होणार -...

बसवकल्याण मध्ये ४ व ५ मार्चला पहिले राष्ट्रीय लिंगायत महाअधिवेशन होणार – प्रदिप वाले…

सांगली – ज्योती मोरे

जागतिक लिंगायत महासभा आणि राष्ट्रीय लिंगायत संघ व सर्व बसवादी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने चार व पाच मार्च रोजी बसवकल्याण येथे पहिले राष्ट्रीय लिंगायत महा अधिवेशन आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय लिंगायत संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप वाले यांनी दिली आहे.

दिल्ली येथील नवीन संसद भावनास महात्मा बसवण्णाचे नाव द्यावे, महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे महात्मा बसवण्णा यांचे राष्ट्रीय स्मारक मंजूर करून शासकीय निधी उपलब्ध करून द्यावा, लिंगायत समाजातील हिंदू लिंगायत दाखल्या सहित सर्व पोट जातींना ओबीसीचे आरक्षण देण्यात यावे, महात्मा बसवण्णा यांचे नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, लिंगायत समाजाला महाराष्ट्रामध्ये भाषिक अल्पसंख्यांक आणि केंद्रांमध्ये अल्पसंख्यांक दर्जा द्यावा,

महात्मा बसवण्णा यांचे वचन साहित्य शैक्षणिक अभ्यासक्रमात घ्यावे, लिंगायत समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये व नोकरीमध्ये प्राधान्य देण्यात यावे,लिंगायत समाजाला जनगणनेमध्ये वेगळा कॉलम द्यावा, लिंगायत समाजातील शरण स्थळांना व मठांणा तीर्थक्षेत्राचा अ वर्ग दर्जा देण्यात यावा, गाव तिथे स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी तसेच लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता देण्यात यावी या मागण्या सदर महाअधिवेशनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.

दरम्यान बसवकल्याण मध्ये खेर मैदानात या राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन केले असून याचे उद्घाटन न्यायमूर्ती नागमोदनदास यांच्या हस्ते व ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर गो.रु.चनबसप्पा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.

लिंगायत धर्म इतिहास परंपरा साहित्य संस्कृती लिंगायत समाजाची सद्यस्थिती आणि भविष्यातील वाटचाल या महत्त्वपूर्ण विषयांवर अभ्यासक, साहित्यिक,लेखक, विचारवंत व विविध मठांचे मठाधीश, देशातील विविध राज्यातील व विदेशातील लिंगायत बांधव सहभागी होणार आहेत. आजपर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या सर्व पोट जातीमधील समाज बांधवही यासाठी उपस्थित राहणार असून, या अधिवेशनात अभ्यासपूर्ण चर्चा करण्यात येणार आहे व पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त समाज बांधवांनी यामध्ये सहभागी व्हावे असे अवाहन प्रदीप वाले यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: