Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीअगोदर त्याने पोलीस पत्नी व चिमुकलीला संपविले...नंतर स्वतःही केली आत्महत्या!...बुलढाणा जिल्ह्यातील धक्कादायक...

अगोदर त्याने पोलीस पत्नी व चिमुकलीला संपविले…नंतर स्वतःही केली आत्महत्या!…बुलढाणा जिल्ह्यातील धक्कादायक घटना…

बुलढाणा

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे आज खामगाव रोडवर असलेल्या पंचमुखी हनुमान मंदिराजवळ ऐका घरात खुनी थरार घडला आहे. चिखली येथील ठाण्यात कार्यरत असलेला महिला पोलिस कर्मचारी वर्षा दंदाले व तिच्या दीड वर्षाच्या मुलीचा वर्षा हिच्या पतीने निर्घृण खून करून स्वतःही गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्याचे कारण अद्याप समोर आले नसून चिखली पोलीस व अंढेरा पोलीस तपास करित आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही मृतक महिला पोलीस कर्मचारी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात कार्यरत होती नुकतीच तिची बदली होऊन ती चिखली येथे राहण्यास आली होती , त्यांना एक दीड वर्षाची चिमुकली पण होती. आज शुल्लक कारणावरुन पती पत्नीत भांडण झाले भांडण विकोपाला गेल्याने पतीने पत्नीची अत्यन्त निर्घृणपणे हत्या केली. कांदा कापायच्या या चाकूने या माणसाने दीड वर्षाच्या मुलीचाही खून केला. दोघांचा जीव घेतल्यानंतर हा व्यक्ती घटनास्थळावरून निघून सरळ काठोडा या गावी गेलं व तेथे त्याने ही विहिरीत गळफास लावून आत्महत्या केली.

पत्नी व चिमुकली ची हत्या करून पती किशोर जनार्धन कुटे रा , खैरव याने ही कवठल शिवारात एका विहिरीत गळफास लावून आत्महत्या केली चिखली तालुक्यात घडलेल्या घटने मुळे खळबळ उडाली असून या घटनेचा तपास चिखली व अंढेरा पोलीस करीत आहे ,

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: