Sunday, December 22, 2024
Homeसामाजिकआधी भिम जयंती… नंतर मेंढरं बघू…!!

आधी भिम जयंती… नंतर मेंढरं बघू…!!

गोकुळ शिरगाव – राजेद्र ढाले

कोल्हापूर जिल्ह्यातील मेंढपाळबांधव  मेंढरांच्या समवेत रानोमाळ भटकत असतात. यावेळी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्याने मेंढपाळ बांधवांनी मेंढरांच्या कळपातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती  तामगावं (ता. करवीर) येथे रानात साजरी करण्यात आली. यावेळी भारताचे संविधान व बाबासाहेबांच्या विचाराची पुस्तकांचे वाचन करण्यात आले.

बोलो रे बोलो. जय भिम बोलो…! धनगरांना एस.टी आरक्षण मिळालेच पाहिजे…!! धनगरांसाठी एस. टी आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे. यासह अन्य घोषणा देण्यात आल्या. मेंढरांच्या कळपातच धनगर समाजासाठी आरक्षण मिळाले असा  नारा यशवंत सेना यांच्या वतीने देण्यात आला.

यावेळी, पश्चिम महाराष्ट्र यशवंत सेनाअध्यक्ष राजेश तांबवे ,पश्चिम महाराष्ट्र तथा संपर्क प्रमुख कोल्हापूर जिल्हा, यशवंत सेना  डॉ. संदीप हजारे , अध्यक्ष, वैद्यकीय आघाडी , कोल्हापूर जिल्हाध्यक्ष तम्मा शिरोले,सचिव संजय काळे, जिल्हाध्यक्षा ललिता पुजारी, पै. राहुल माने, डॉ. शिवराज पुजारी, ॲड.  विश्वजीत गावडे, अमर पुजारी,चंद्रकांत वळकुंजे , गंगाराम हजारे , निवास कोळेकर , संदीप वळकुंजे –  उत्तम पाचगावे ,शहाजी बनकर,  सागर पुजारी , शितल पुजारी , रामभाऊ दुधाळे , तालुका प्रमुख यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थितीत होते.

फोटो ओळ: तामगावं (ता.करवीर) येथे यशवंत सेनेच्या वतीने मेंढपाळ धनगर समाजबांधव यांच्या उपस्थितीत विवीध ठिकाणी रानातच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी पदाधिकारी व धनगर बांधव भारताचे संविधान वाचन करताना.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: