Monday, December 23, 2024
Homeराज्यपातूर येथे डेली निड्स च्या दुकानाला आग...लाखो रुपयाचा माल आगीत खाक...

पातूर येथे डेली निड्स च्या दुकानाला आग…लाखो रुपयाचा माल आगीत खाक…

पातूर – निशांत गवई

शहरातील खानापूर रोड वरील एका डेली निड्स च्या दुकानाला काल रात्री आग लागून या आगीत लाखो रुपयाचे डेली निड्स जळून खाक झाल्याचि घटना 29 जानेवारी च्या सकाळी घडली याबाबत सविस्तर वृत्त असे कि पातूर येथील युवा नितीन भरकर या युवकांने आपला उद्योगसाठी लाखो रुपये खर्च करून खानापूर रोड वर कृषी उत्पन्न केंद्रात एक दुकान उद्योगधंद्या करिता भाडेतत्वावर घेऊन उद्या दिनांक 30 जानेवारी रोजी आपल्या दुकानाचा शुभारंभ करण्याचा मानस ठेवून 28 जानेवारी ला दुकानात सर्व डेली निड्स चे सामान लावून घरी गेले,

असता अचानक दुकानाला आग लागली असल्या चे नितीन भरकर यांना समजले असता त्यांनी तात्काळ दुकानाकडे धाव घेतली तर काही नागरिकांनि या घटनेचि माहिती तात्काळ अग्निशमन दल ला देण्यात आली चालक अशपाक भाई यांनी तात्काळ घटनास्थळ वर येऊन आग विझविन्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत सर्व माल जळून खाक झाला होता.

याबाबत सकाळी तलाठी पठाण यांनी पंचनामा केला असून या आगीत नितीन भरकर यांचे अंदाजे आठ ते दहा लाख रुपया चे नुकसान झाले असल्या चि माहिती नितीन भरकर यांनी दिली सदर घटने चि तक्रार पातूर पोलिसांत देण्यात आली असून ठाणेदार हरीश गवळी यांच्या मार्गदर्शन खाली पातूर पोलीस करीत आहे चौकट : लक्ष्मी डेली निड्स या दुकानात आग लागली नसून अज्ञात माथेफिरू नि हि आग लावली असल्याचि चर्चा घटनास्थळा वर सुरु होती.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: