Monday, January 13, 2025
Homeराज्यआविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांच्याकडून गग्गुरी कुटुंबाला आर्थिक मदत...

आविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांच्याकडून गग्गुरी कुटुंबाला आर्थिक मदत…

सिरोंचा – तालुक्यातील ग्राम पंचायत वेंकटापुर अंतर्गत येणाऱ्या ग्लासफोर्डपेठा येथील आविसं कार्यकर्ता मदनक्का गग्गुरी यांच्या वडिलांच्या दीर्घआजाराने दुःखद निधन झाला.

स्वर्गवास समय्या गग्गुरी यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांना भेटून कुटुंबाची सांत्वन केले. तसेच पुढे होणाऱ्या तेरवी कार्यकामासाठी आदिवसी विध्यार्थी संघटनेचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांनी स्वर्गवास समय्या गग्गुरी यांच्या मुलगी मलक्का गंपा, मदनक्का गग्गुरी, चिनक्का गग्गुरी यांना भेटून आस्थेने विचारपूस करून तेरवी कार्यक्रमासाठी आर्थिक मदत देऊन गग्गुरी कुटुंबियांचे सांत्वन केले आहे.

यावेळी आविसं सिरोंचा तालुका श्री. मा. बानय्या जनगाम, श्री. मा. अजय आत्राम सरपंच तथा कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक सिरोंचा , माजी उपसरपंच वेंकटस्वामी कारस्पल्ली, उपसरपंच मंजुला दिकोंडा , ग्रा, प सदस्य, दुर्गाय्या तलांडी, ग्रा, प सदस्य, पोसक्का अल्लुरी, रमेश शिवराला, श्रीनिवास दिकोंडा, रोहन अल्लूरी, माजी ग्रा, प सदस्य, श्रीनिवास कावरे, राजेश गग्गुरी, येरान्ना बोगुटा, गणेश रच्चावार, सिनु गोडाम, लक्ष्मण बोल्ले, लवन, नागेश बोगडामिधी, राजेश बोगुटा, सारय्या गग्गुरीसह ग्लासफोर्डपेठा गावातील आविसंचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी – उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: