Monday, December 23, 2024
Homeराज्यआल्लापल्ली येथे हनुमान मंदिर बांधकामासाठी माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्याकडून आर्थिक...

आल्लापल्ली येथे हनुमान मंदिर बांधकामासाठी माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्याकडून आर्थिक मदत…

हनुमान मंदिर बांधकामासाठी मन्नेवार समाजाचा पुढाकार

अहेरी – आल्लापल्ली येथील भामरागड ला जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या मन्नेवार वार्डात नवीन हनुमान मंदिराचे बांधकाम सुरू असून या मंदिर बांधकामा संदर्भात येथील मन्नेवार समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी व युवकांनी भारत राष्ट्र समिती चे नेते,

आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची भेट घेऊन हनुमान मंदिर बांधकामासाठी आर्थिक सहकार्याची अपेक्षा केले असता, माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी या धार्मिक कार्यासाठी आपल्या परीने आर्थिक मदत केल्याने आल्लापल्ली येथील मन्नेवार समाज बांधवांनी याकार्याप्रति समाधान व्यक्त केले.

यावेळी माजी सरपंच दिलीप गंजीवार,माजी सरपंच विजय कुसनाके, लक्ष्मण गंजीवार,आशालू तोगरवार,मदन भूपेल्लीवर,मुत्यालु पोचमपल्लीवर, राजण्णा पोचमपल्लीवर, राजण्णा गंजीवार,येलय्या सल्लम,मनोज पुल्लीवार,सुधीर गंजीवार,आशिष परसा, पापा मुडारप,जुलेख शेख,विनोद कावेरी, संदीप बडगे,सुधाकर कावेरी आदि उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: