तेल्हारा – गोपाल विरघट
पॅनोरमिक ग्रुपच्या पॅन कार्ड क्लब लिमिटेडच्या सभासद तथा ठेवीदारांना व गुंतवणूकदारांना आर्थिक लवादाने दिलासा दिला आहे. आपल्या ठेवीची माहिती दि नॅशनल कंपनी ट्रिब्युनल मुंबई या आर्थिक लवादाने येत्या शुक्रवारी २३सप्टेंबर पर्यंत प पॅन कार्ड क्लब लिमिटेड मध्ये गुंतवलेल्या ठेवीचा तपशील ऑनलाईन करण्याचे आदेश दिले आहेत आता ती तारीख वाढवून 9 डिसेंबर 2022 पर्यंत मुदत वाढवून दिली आहे.
त्यामुळे ठेवीदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पॅन कार्ड क्लब लिमिटेड या कंपनीने लाखो रुपयांच्या ठेवी स्वीकारल्या या ठेवीतून मालमत्ता उभी केली ,मात्र ठेवी परत देताना कंपनी बुडीत निघाली. पॅन कार्ड क्लब कडून मोठ्या प्रमाणात पहिल्या काही वर्षांमध्ये परतावा मिळाला. त्यामुळे या कंपनीमध्ये अनेकांनी पैसा गुंतविला ,मात्र कंपनी बुडीत निघाल्यामुळे कोट्यावधी रुपयाचा ठेवीदारांचा पैसा कंपनीमध्ये अडकून पडला होता.
या कंपनीच्या सभासद तथा ठेवीदारांना गुंतवणूकदारांना ,दि नॅशनल कंपनी ट्रिब्युनल मुंबई या आर्थिक लवादाने ,शुक्रवार दिनांक 23 सप्टेंबर 2022 पर्यंत पॅन कार्ड क्लब मध्ये गुंतवलेल्या ठेवीचा तपशील ऑनलाईन सादर करण्याचे आदेश दिले आहेत याबाबतचा निकाल ९ सप्टेंबरला २०२२ ला देण्यात आला असून, यासाठी पॅन कार्ड क्लब च्या प्रकरणांमध्ये अंतरिम निर्णय व्यावसायिक म्हणून राजेश सुरेशचंद्र सेठ यांची निवड करण्यात आली आहे.
देशभरामध्ये पॅन कार्ड मध्ये 52 लाख गुंतवणूकदार असून त्यांच्याकडून 75 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे ,तर एवढी रकमेची मालमत्ता कंपनीने विविध क्लब, हॉटेल्स ,रिसाॅट्रर्स व जमीन खरेदीमध्ये उभी केली होती . पॅन कार्ड क्लब ची स्थापना 24 जानेवारी 1997 ला झाली असून या कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय कल्याण दास उद्योग भवन, सेंचुरी भवन ,प्रभादेवी मुंबई ,येथे सुरू करण्यात आले होते त्यावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुधीर मोरावेकर होते.
त्यांच्या पश्चात त्यांचे दोन पुत्र आणि पत्नी यांनी ही कंपनी चालवली मात्र ते अयशस्वी ठरले असून कंपनी बुडीत निघाल्याने ठेवीदाराच्या ठेवी अडकून पडल्या आहेत. यामध्ये देशातील अनेक खेड्यापाड्यातील लोकांनी गुंतवणूक केलेली आहे यामध्ये अकोला जिल्ह्यातील अनेक गावांतील लोकांनी गुंतवणूक केलेली आहे.
गुंतवणूकदाराच्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी एनसीएलटी कोर्टामध्ये पॅन कार्ड क्लब संदर्भात चालू केस चा 9 सप्टेंबर 2022 रोजी निकाल लागला असून पॅन कार्ड चे सर्व गुंतवणूकदार फायनान्शियल क्रेडिटर्स म्हणून ग्राह्य धरण्यात आले आहेत.