Sunday, December 22, 2024
Homeराज्यअखेर तहसीलदार निलेश मडके यांचे स्थानांतरण… सुनील चव्हाण यांची पदस्थापना…

अखेर तहसीलदार निलेश मडके यांचे स्थानांतरण… सुनील चव्हाण यांची पदस्थापना…

आकोट – संजय आठवले

आकोट येथे रुजू होताच येथून बदलीवर जाणेकरिता देव पाण्यात घालून बसलेल्या तहसीलदार निलेश मडके यांची मनीषा अखेर पूर्ण झाली असून त्यांनी केलेल्या मागणीनुसार त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांचे रिक्त स्थानि सुनील चव्हाण यांची पदस्थापना करण्यात आली आहे.

अनेक महिन्यांपासून आकोट तहसीलदार निलेश मडके हे बदलीवर जाण्यास उत्सुक होते. त्याकरिता त्यांनी जबरदस्त फिल्डिंगही लावली होती. परंतु शासनातर्फे होणाऱ्या बदली प्रक्रियेने दरवेळी त्यांना हुलकावणी दिली होती. पण त्यांनी बदलीकरिता अथक प्रयास सुरूच ठेवले.

आणि अखेर १२ जून २०२३ रोजीचे आदेशाद्वारे त्यांची आकोट येथून बदली करण्यात आली आहे. त्यांना आता तहसीलदार मेहकर जिल्हा बुलढाणा या पदावर रुजू व्हायचे आहे. त्यांचे रिक्त झालेल्या जागेवर सुनील चव्हाण यांची पदस्थापना करण्यात आली आहे.

चव्हाण हे तहसीलदार कळंब जिल्हा यवतमाळ येथे सेवारत होते. या दोन्ही तहसीलदार महोदयांना १५ जून चे आत आपले बदली स्थळी रुजू व्हायचे आहे. त्यामुळे दिनांक १५ जून २०२३ पासून नवीन तहसीलदार यांचा कार्यकाळ सुरू होणार आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: