- टाकी स्थलांतरीत करण्याचा हानुन पाडला डाव
- बि.डी.ओ. सह पाणिपुरवठा अभियंत्यांच्या मध्यस्थीने सुटला तिढा
रामटेक – राजू कापसे
रामटेक तालुक्यातील आर्थिक दृष्टीकोनातुन सधन असलेल्या ग्रामपंचायत शितलवाडी (परसोडा) येथील वार्ड क्र. १ येथे श्री. अनंतराव दाभाडे यांचे घरासमोरील पाण्याचा टाकीचे काम सुरू होते, मात्र टाकी बांधकामासाठी खोदन्यात आलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे लगतच्या एक दोन घरांना धोका निर्माण झाला होता.
नेमका हाच मुद्दा धरून येथीलच काही बोटावर मोजण्याइतपत लोकांनी काही राजकिय मंडळी व अधिकाऱ्यांना हाताशी पकडुन टाकी बांधकामात विविध अडथळे निर्माण केले मात्र ग्रामपंचायत शितलवाडी चे सरपंच मदन सावरकर व उपसरपंच विनोद सावरकर यांच्यासह येथील शेकडो नागरीकांनी राजकिय नेते, अधिकारीवर्ग व काही विरोधकांना लढा देत अखेर ही लढाई जिंकली व आता याच जागेवर पाण्याच्या टाकी बांधकामाचा मार्ग मोकळा झालेला आहे.
शितलवाडी ग्रामपंचायतच्या परसोडा भागातील वार्ड क्र. १ ते ५ मध्ये नागरीकांना पाण्याची मोठी बिकट समस्या होती. एक दिवसाआड पाणि येणे आणि तेही कमी फोर्स राहाणे यामुळे विशेषतः या भागातील महिलावर्ग पुरता कंटाळला होता. तेव्हा ही समस्या हेरून सरपंच मदन सावरकर व उपसरपंच विनोद सावरकर यांनी वरच्या पातळीवर सारखा पाठपुरावा केला.
तेव्हा जलजिवन मिशन अंतर्गत येथे १ कोटी २५ लक्ष रुपयांचे पाण्याच्या टाकी बांधकामाचे काम मंजुर झाले. यानंतर आमदार आशिष जयस्वाल यांचे हस्ते भुमीपुजनही पार पडले. बांधकाम सुरु झाले. मोठा खड्डा खोदण्यात आला. यानंतर काही दिवस कंत्राटदाराकडुन बांधकाम संथगतीने सुरु राहीले. यानंतर पावसाळा सुरु झाला.
तेव्हा पाणी जिरून खड्ड्याच्या भाग हळु हळु खचु लागला. परीणामस्वरूप खड्ड्यालगतच्या दोन घरांना धोका निर्माण झाला व नेमका हाच मुद्दा पकडुन काही बोटावर मोजण्याइतपत लोकांनी काही राजकिय व अधिकाऱ्यांना तक्रार करून सुरु असलेले बांधकाम बंद पाडले.
तेव्हा टाकी बांधकाम न झाल्यास नागरीकांपुढे उद्भवनाऱ्या समस्या डोळ्यापुढे ठेवत येथील सरपंच मदन सावरकर व उपसरपंच विनोद सावरकर यांनी पुढाकार घेत उद्भवलेल्या समस्येला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली, त्याला परीसरातील शेकडो महिला – पुरुषांनी सहकार्याची साथ दिली व दोनदा पंचायत समिती कार्यालयाला घेराव करीत निवेदन दिले. दरम्यान पारशिवनी येथील उपविभागीय अभियंता पाणिपुरवठा यांनाही पाचारण करण्यात आले.
यावेळी सरपंच, उपसरपंच व शेकडो नागरीकांनी टाकी बांधकाम नियोजित जागेवर झालेच पाहीजे या मागणीला रेटून धरले. यावेळी संबंधीत अधिकाऱ्यांनी सरपंच, उपसरपंच व शेकडो नागरीकांचा रोष पाहुन अखेर ‘ टाकीसाठी खोदन्यात आलेल्या खड्ड्यामुळे धोका निर्माण झालेल्या घरांना अगोदर सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन उपाययोजना करावी व नंतर टाकी बांधकाम त्याच जागेवर सुरु करावे ‘ असा तोडगा काढला.
तेव्हा सरतेशेवटी या पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचा मार्ग अखेर मोकळा झाला. निवेदन देतेवेळी ग्रामपंचायत सरपंच मदन सावरकर, उपसरपंच विनोद सावरकर , डॉ . अनंत दाभाडे, किष्णा गेचुडे, , किशोर फलके, धनशाम सोनवणे, चंद्रकांत लाबडे, कमलेश सहारे, नंदकिशोर तादुलकर, सुरज भिमटे, संतोष मेश्राम, जयराम वंजारी, अविनाश राऊत, विजय पंधरे, कुलदीप शेंडे, विशाल लाडोकर,
ईश्वर वरखडे, सविता मानकर, शिमा शिरसागर, पंचफुला भलावी, माधुरी बागंरे, सीमा करनकर, सुरज सलामे, कोमल खंडारे, आरती कुथे, आरती दुबे मोना धोपटे, प्रभा लाडेकर, गौतम गजभिये, दिलिप उईके, राजश्री जावलकर, शुभम खडसे, सुभाष ठाकरे, लिलाबाई मेहर, मनिषा बेंदरे, अनपुन्ना मालीक, सय्यद इस्माईल, मनोज मरस्होले , राजू पिलारे, श्रीमती छाया लाबडे,आरती कुथे दिपा सहानी, विमलबाई ढोमने, पुष्पा सलामे, हेमराज सहारे, अनिता दियेवार आदी. उपस्थित होते.