मुंबई: अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्यावरील अनधिकृत बांधकामावर स्वतःच पाडण्याचा निर्णय नारायण राणे यांनी घेतला असून सकाळीच या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने अनधिकृत बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पडण्याचे आदेश जारी केले होते, आदेशानंतर अखेर राणेंच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्याचं काम सुरू झालं आहे.
तर अनेक दिवसांपासून विरोधकांच्या निशाण्यावर असलेला नारायण राणे यांचा जुहू येथील अधिश बंगला आज यातील अनधिकृत बांधकाम स्वतः नारायण राणे हे पाडीत आहे. या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार झाली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेने राणे यांना या बांधकामाबद्दल नोटीस बजावली होती. तसेच राणे यांच्या बंगल्याची पाहणीही केली होती. त्यानंतर महापालिकेने अहवाल तयार केला होता.
या प्रकरणी राणे यांनी कोर्टात धाव घेतली होती. कोर्टानेही पालिकेचा रिपोर्ट ग्राह्य धरून राणे यांच्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याचं मान्य केलं होतं. त्यानंतर कोर्टाने येत्या दोन आठवड्यात बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. राणे यांनी स्वत: हे बांधकाम पाडून घ्यावं किंवा महापालिका तोडक कारवाई करेल, असं कोर्टाने म्हटलं होतं.
कोर्टाने राणेंना दहा लाखाचा दंडही ठोठावला होता. कोर्टाच्या या आदेशानंतर आजपासून राणे यांनी त्यांच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरुवात केली आहे. राणे यांनी हे बांधकाम पाडल्यानंतर महापालिका पुन्हा पाहणी करेल.