सहाय्यक पोलिस अधीक्षक सह आलेगाव येथील पोलिसांचा मोठा पोलिस बंदोबस्त तैनात…
पातूर – निशांत गवई
पातूर तालुक्यांतील चान्नी पोलिस स्टेशन अंतर्गत आलेगाव 29 मार्च चे सायंकाळीं झालेल्या झालेल्या किरकोळ हाणामारीचे रुपांतर चाकू मारामारी मध्ये झाले त्या मध्ये चेतन काळदाते याचा 3 तारखेला मृत्यू झाला त्या मुळे आलेगाव पूर्ण बंद व गावामध्ये पूर्ण 4 एप्रिल रोजी दिवसभर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी सतर्कता बळगत मोठं पोलिसांचा बंदोबस्त गावामध्ये तैनात करण्यात आला होता. शेवटी मृत चेतन काळदाते यांचे वर सायंकाळीं शांततेत अंतीम संस्कार करण्यात आले आहे.
मृत व्यक्तींचे परिवरांनी अंतिम संस्कार झाले नंतर सहाय्यक पोलिस अधीक्षक गोकुळ राज यांची पोलिस चौकी आलेगाव येथील भेटून पूर्ण प्रकरणाचा निकाल पूर्ण निपक्षपणे तपास करावा. व त्वरीत आरोपींना अटक करावी आही मागणी मृत परिवाराचे वतीने पोलिसांना करण्यात आली ती पोलिसांनी मान्य करून निःपक्ष पने कोणाचेही दबावाला बळी न पडता कार्यवाही करण्यात येई व लवकर आरोपींनी पकडण्यात येईल अशे आश्वासन उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक पोलिस अधीक्षक यांनी दीले.
सहाय्यक पोलिस अधीक्षक हे दिवसभर आलेगाव पोलिस चौकी येथील कोणताहि अनुसूचित प्रकार घडू नये या करीता दिवसभर तल ठोकून होते . योगेश वाघमारे ठाणेदार चान्नी अनिल जुंमले ठाणेदार बाळापूर गजानन पोटे सहाय्यक ठाणेदार पातूर गणेश महाजन पोलिस उपनिरिक्षक चान्नी सह इत्यादि पोलिस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते उपस्थिती होते
हत्येचा गुन्हा दाखल
सदर प्रकरणामध्ये 324,294,427,323,506,,34, वाढीव कलम 302,307,अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात
आले आहेत.
काही वेळासाठी आरोपींना अटक करणार नाही तोपर्यंत अंतिम संस्कार करणारं नाहि. अश्या प्रकारची भूमिका लोकांनी व मृतक परीवारांनी घेतली होती. मात्र काहींचे मध्यास्तीने शांततेने अंतिम संस्कार करण्यात आले.
मृत व्यक्तीचे परिवाराला भेटलो असता पूर्ण कार्यवाही करणार असलेचे सांगीतले. मृत व्यक्ती झाले मुळे 302, चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आणि जे जखमी आहेत त्यांचे.बद्दल सुद्धा 307 गुन्हा दाखल केलाआहे, आरोपीचा जामीन तत्काळ रद्द करावा. आशी मागणी कोर्ट मध्ये करणार आहे. लवकर आरोपींना अटक करण्यात येईल
सहाय्यक पोलिस अधीक्षक तथा
उपविभागीय पोलिस अधिकारी बाळापूर
सदर प्रकरणामध्ये व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे 302 307चा गुन्हा वाढविला आहे. सदर व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याने 302 चा गुन्हा वाढविला असल्याचे कोर्टात सादर. पूर्वीचे गुन्ह्या मध्ये मिळालेली बैल रद्द करण्यात यावी . अशी मागणी करणार कोर्ट मध्ये तत्काळ करणार आहे . लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल
योगेश वाघमारे ठाणेदार
तथा तपास अधिकारी