रामटेक -: ( तालुका प्रतिनिधी )
गेल्या उन्हाळ्यात रामटेक शहरातील विविध वार्डात भीषण पाणीटंचाई नागरिकांना जाणवली. यामध्ये प्रामुख्याने जयप्रकाश वार्ड, अंबाडा वार्ड, स्वामी विवेकानंद वार्ड, महात्मा फुले वार्ड, आंबेडकर वार्ड, टिळक वार्ड, रामाळेश्वर वार्ड, विनोबा भावे वार्ड, आझाद वार्ड व शिवाजी वार्ड यांचा समावेश असुन येथे प्रचंड पाणीटंचाई निर्माण झालेली होती तेव्हा या विरोधात रामटेक शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध भागात घागरे बजाव आंदोलन, धनणे आंदोलन करण्यात आली.
या प्रयत्नांना शेवटी यश आले व नागरिकांना पाणिपुरवठ्यासाठी आवश्यक असलेल्या संप व पंप चे बांधकाम अखेर सुरु झाले. यामुळे नागरिकांनी शहर काँग्रेस कमेटीचे व विशेषतः माजी नगरसेवक दामोधर धोपटे यांचे यावेळी आभार व्यक्त केलेले आहे.
विशेष म्हणजे पाणि समस्येसाठी माजी नगरसेवक दामोधर धोपटे यांच्या नेतृत्वात शहर काँग्रेस कमेटीने जे घागरे बजाव आंदोलन केले त्यामुळे नगरपालिका प्रशासनाचे पाणीटंचाईच्या विषयाकडे लक्ष वेधल्या गेले. याचाच परिणाम म्हणून उपविभागीय अधिकारी (महसूल) तथा प्रशासक, नगरपरिषद, रामटेक यांनी याची गंभीर दखल घेत, नगरपालिका प्रशासनास तातडीने सूचना देऊन वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याबाबतचे आदेश दिलेत. परिणामी बऱ्याच भागातील पाणीटंचाई दूर झाली.
परंतु प्रामुख्याने आंबेडकर वार्ड त्यालगतचे टिळक वार्ड, सुभाष वार्ड, रामाळेश्वर वार्ड येथील व विनोबा भावे वार्ड त्यालगतचे शिवाजी वार्ड, आझाद वार्ड या भागातील पाणीटंचाई मात्र दुर झाली नव्हती. आंबेडकर वार्ड व विनोबा भावे वार्ड येथे पिण्याच्या पाण्याची टाकी आहे परंतु ती रिकामी आहे. या भागातील समस्या कायमस्वरूपी दूर होण्याच्या दृष्टिकोनातून ,सदर टाक्यांजवळ संप व पंपचे बांधकाम करणे अत्यंत गरजेचे असताना सुद्धा न. प. प्रशासनाच्या वतीने त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर रामटेक शहर काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी संप व पंप बांधकाम करण्याबाबतची मागणी केली.या मागणी करिता आंबेडकर वॉर्ड येथील रिकाम्या टाकी जवळ धरणे आंदोलन सुद्धा केले. गांधी चौक, रामटेक येथे उपोषण आंदोलन केले. त्याच दिवशी जिल्हाधिकारी मॅडम, नागपूर यांनी आमच्या आमरण उपोषण आंदोलनाची दखल घेत , वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत रुपये ४३,४८,१६३ लक्ष चे प्रस्तावास प्रशासकीय मान्यता प्रदान केली. याबाबतचे लेखी पत्र व प्रशासकीय मंजुरी प्रत्यक्षात उपोषण मंडपी नायब तहसीलदार व न. प. प्रशासनाचे अधिकारी घेऊन उपस्थित झाले व उपोषणाची सांगता झाली.
त्यानंतर न. प. प्रशासनाने याबाबतची टेंडर प्रोसेस पूर्ण करून, संबंधित कंत्राटदाराने आंबेडकर वार्ड व विनोबा भावे वार्ड येथील टाक्यांजवळ संप व पंप चे बांधकामास सुरुवात केली.
लवकरच सदर बांधकाम पूर्ण होऊन आंबेडकर वॉर्ड, टिळक वॉर्ड, सुभाष वॉर्ड, रामेश्वर वार्ड, विनोबा भावे वार्ड, आझाद वार्ड, शिवाजी वार्ड येथील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या ही कायमस्वरूपी दूर होईल.
यावेळी श्री दामोधर धोपटे अध्यक्ष रामटेक शहर काँग्रेस कमिटी, सौ. शोभा राऊत माजी अध्यक्ष न.प.रामटेक, प्रा. तुलारामजी मेंढे ज्येष्ठ नेते रामटेक शहर काँग्रेस कमिटी, श्री कवीश्वरजी खडसे ज्येष्ठ नेते रामटेक शहर काँग्रेस कमिटी, श्री परमदास राऊत ज्येष्ठ नेते रामटेक शहर काँग्रेस कमिटी,श्री अश्विन सहारे युवा नेते, श्री सुशांत राळे अध्यक्ष रामटेक शहर काँग्रेस कमिटी (अनुसूचित जाती जमाती विभाग), श्री संजय बागडे युवा नेते, सौ पुष्पाताई बर्वे माजी नगरसेविका, श्रीमती आशाताई हांडे, सौ ममता ताई राळे, सौ विमलताई नागपुरे उपाध्यक्ष शहर महिला काँग्रेस, सौ शारदाताई बर्वे महासचिव शहर महिला काँग्रेस, श्री कैलास बागडे, श्री रितेश साखरे यांचे सहित वार्डातील नागरिक व महिला उपस्थित होते.