रामटेक – राजु कापसे
गेल्या कित्येक वर्षांपासून वारंवार मागण्या करूनही वाहन चालकांच्या समस्या सोडवण्यास प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप वाहन चालक संघटना करीत होत्या. आजपर्यंत त्यांचा मागणीकडे सगळेच राजकीय पुढारी टाळाटाळ करीत असतांना, आपला कोणताही स्वार्थ न बघता श्री विजय हटवार साहेब त्यांचा मदतीला धावून आलेत.
हटवार साहेबांनी लगेच मुख्यमंञी एकनाथ शिंद यांना निवेदन दिले. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांनी लगेच हटवार साहेबांचे निवेदन स्विकारून श्री पराग जैन साहेब (परिवहन सचिव, मंत्रालय महाराष्ट्र राज्य), श्री जे.बी पाटील साहेब (परिवहन कमिशनर) व श्री लोही साहेब (उपयुक्त परिवहन) यांचा सोबत हटवार साहेबांनी तातडीची बैठक घेऊन राज्याचे कॅबिनेट मंञी ना. दादा भुसे यांनी ताबडतोब वाहन चालकांच्या समस्या सोडवण्यासाठी वाहनचालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.
या योजनेत सर्व वाहनचालकांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील सगळ्याच वाहनचालकांना होईल. अपघात समय जनतेकडून तसेच परिवहन अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्याकडून वाहनचालकास होणाऱ्या मारहाणीस कायदेशीर प्रतिबंध करण्यात यावे, वाहन चालकास असंघटित कामगार वर्गात समाविष्ट करण्यात यावे, बांधकाम मजुरांना लागू असणाऱ्या सरकारी योजनांचा लाभ वाहन धारकास पण देण्यात यावे व वाहनचालकांच्या सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने वाहनचालकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली.
नागपुर जिह्यातील युवकांचे प्रेरणा स्रोत व्यक्तीमत्व म्हणून प्रचलित असणारे श्री विजय हटवार यांचा नेतृत्वातील शिष्टमंडळात प्रशांत मसार (कार्यकारी जिल्हाध्यक्ष नमो नमो मोर्चा भारत) सुनिल पिल्ले (जिल्हा कार्यकारी अध्यक्ष दक्षिण भारतीय नमो नमो मोर्चा, नागपुर), अनिल चौरसिया (तालुकाध्यक्ष नमो नमो मोर्चा भा. कामठी), जय संघर्ष ड्रायव्हर संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री प्रविण वाघ,
विदर्भ अध्यक्ष श्री प्रफुल्ल वैद्य, नागपूर जिल्हा अध्यक्ष श्री अमोल खापेकर, नागपुर जिल्हा सल्लागार श्री मंगेश वंजारी कमेटी मेंबर रहेमान तांबोळी, सेख शाकिर व जय जय संघर्ष वाहन चालक-मालक संघटने पदाधिकारी उपस्थित होते. श्री विजय हटवार यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून या योजनेचा समस्त वाहन चालकास नक्कीच फायदा होईल.