सांगली – ज्योती मोरे.
म्हेत्रे हॉस्पिटल वखार भाग टिंबर एरिया मिरज यांनी हरित न्यायालयामध्ये अपील दाखल केले होते ते अपील फेटाळत माननीय हरित न्यायालयाने आणखीन पर्यावरणाचे नुकसान केल्याबद्दल (१,८०,२५०) एक लाख ऐंशी हजार दोनशे पन्नास रुपये इतका दंड वाढवून एकूण (५२,३,८७५) बावन्न लाख तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये दंड भरण्याची माननीय हरित न्यायालय यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून दंडाची नोटीस बजावली आहे.
बायोमेडीकल वेस्ट मॅनेजमेंट रुल २०१६ अन्वये सर्व हाॅस्पिटलनी जैववैद्यकीय कचरा नागरीकांच्या जिवितास आणि पर्यावरणास धोका न होता शास्त्रीय पध्दतीने नष्ट करण्याचे बंधन आहे.
तथापी वखारभाग मिरज येथील डाॅ. म्हेत्रे हाॅस्पिटलने पर्यावरणविषयक कायद्ये आणि नियमाची पायमल्ली करत जैववैद्यकीय कचरा हाॅस्पिटल बाहेर उघडयावर टाकल्याचे निदर्शनास आले होते. तसेच त्याकरीता आवश्यक ती नोंदणी प्रदुषण मंडळाकडे केलेली नव्हती. हाॅस्पिटलचे सांडपाणी
खंदकाच्या जागेत सोडून पर्यावरणास हाणी पोचविण्याचे कृत्य केले होते. या प्रकारणाची गंभिर दखल घेत हाॅस्पिटल परीसराची पाहणी केली असता बेकायदेशीरपणे जैववैद्यकीय कचरा उघडयावर टाकल्याचे निदर्शनास आले. तसेच हाॅस्पिटलमधील सांडपाणी प्रक्रिया करणारी कोणतीही यंत्रणा अस्थित्वात नव्हती.
कोणतीच प्रक्रिया न करता आरोग्यास घातक सांडपाणी प्रक्रियेविना महापालिकेच्या उघडया खंदकामध्ये सोडून नागरीकांच्या जिवितास धोका उत्पन्न होणारे कृत्य या हाॅस्पिटलकडून केले जात होते. त्याबाबत महापालिका प्रशासन आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी केल्या गेल्या.
सदर तक्रारीवर योग्य आणि आवश्यक कारवाई करण्यात दोन्हीही यंत्रणेने उदासिनता दाखविल्यामुळे अॅड. ओकांर वागींकर यांचेमार्फत हाॅस्पिटलवर कायदेशीर कारवाई व्हावी याकरीता जानेवारी महिन्यामध्ये राष्ट्रीय हरित न्यायालय पुणे खंडपीठ येथे समितीचे अध्यक्ष श्री. तानाजी रुईकर यांनी याचिका दाखल केली होती.
त्या याचिकेची गंभीर दखल घेत न्यायालयाने तज्ञ समितीची नेमणूक केली. सदरच्या तज्ञ समितीने डाॅ. म्हेत्रे हाॅस्पिटलची प्रत्यक्ष पाहणी करून न्यायालयास अहवाल सादर केला होता. त्या अनुषंगाने माननीय न्यायालयाने पर्यावरणाची हाणी केल्याबद्दल दंडाची नोटीस महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळामार्फत डाॅ. म्हेत्रे हाॅस्पिटलला बजावण्याचे आदेश दिले होते.
या आदेशा विरोधात म्हेत्रे हॉस्पिटल यांनी दंडाची रक्कम चुकीची आहे आणि कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केलेलं नाही म्हणून अपील दाखल केले होते ते अपील फेटाळत कोर्टाने जुना दंड ५०,४५,६२५ रुपये पन्नास लाख पंचेचाळीस हजार सहाशे पंचवीस रुपये अधिक (१,८०,२५०) एक लाख ऐंशी हजार दोनशे पन्नास रुपये इतका दंड वाढवून एकूण (५२,३,८७५) बावन्न लाख तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये इतका दंड ठोठावला आहे..
१.दंडाची रक्कम १५ दिवसाच्या आत शासनाच्या खात्यात भरावी.
२. पर्यावरणपुरक सर्व प्रकारच्या शासकीय परवानग्या एक महिन्याच्या आत घेण्यात याव्यात.
३. आदेश्यातील अटींची पुर्तता एक महिन्यात न केल्यास हाॅस्पिटल बंदची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल.
४. जल (प्रदुषण प्रदुषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियमातील तरतुदीनुसार हाॅस्पिटल चालवणार्या डाॅक्टरांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश.
या सर्व कारणाकरीता जल (प्रदुषण प्रदुषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम १९७४ आणि ३१अ च्या कलम ३३अ, पाणी (पी आणि सीपी) कायदा १९७४ आणि वायु (पी आणि सीपी) कायदा १९८१ आणि धोकादायक कचरा (व्यवस्थापन, हाताळणी), पर्यावरण (संरक्षण) कायद्या १९८६ अन्वये डाॅ. म्हेत्रे हाॅस्पिटलवर ही कायदेशीर दंडाची नोटीस देण्यात आली आहे.
सांगली-मिरज ही वैद्यकीय पंढरी म्हणून ओळखली जाते त्याच ठिकाणी असे बेकायदेशीर, नागरीकांच्या जिवितास आणि पर्यावरणास हाणी करणार्या कोणत्याही हाॅस्पिटलची गय केली जाणार नाही असे समितीचे अध्यक्ष श्री. तानाजी रुईकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी आर्किटेक्ट रवींद्र चव्हाण, ॲड.ओंकार वांगीकर, ॲड. असिफ मुजावर, सागर शिंदे,महेश जाधव,संतोष शिंदे, गोरख व्हणखडे,राजू ऐवळे,तौसिफ बागणीकर, दाउद मुजावर उपस्थित होते.