Friday, July 12, 2024
spot_img
Homeराज्यपूर्व विदर्भाच्या शिक्षण व हरित क्रांतीचे जनक स्व. मनोहरभाई पटेल यांना अभिवादन…

पूर्व विदर्भाच्या शिक्षण व हरित क्रांतीचे जनक स्व. मनोहरभाई पटेल यांना अभिवादन…

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

गोंदिया – प्रेम, माणुसकी, निस्वार्थपणा, समाजोन्नती, अश्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी आणि पूर्व विदर्भातील शिक्षण व हरित क्रांतीचे जनक म्हटले कि स्वर्गीय मनोहर भाई पटेल यांचे नाव स्मरणात येते. कोणतेही पॅड नसत्तांना समाजासाठी काही करण्याची इच्छा शक्ती असली कि ते साध्य होते हेच स्व मनोहरभाई पटेल यांनी करून दाखविले.

त्यामुळे गोंदिया भंडारा जिल्हा चा नव्हे तर सम्पुर्ण विदर्भात त्यांची आठवण मोठ्या आदराने केली जाते. स्वतः ४ पर्यंत शिक्षण घेतले असतांना गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्यत प्राथमिक पासून ते उच्च शिक्षण पर्यं जाळे पसरविण्याचे कुणी केले असेल तर सर्व मुखी इकाचा नाव येतो शिवाय देशाचेच पोशिंद्याची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी पूर्व विदर्भात हरित क्रांतीचा पायंडा रचणारे पूर्व विदर्भात हरित क्रांतीचा पायंडा रचणारे स्वनाम धन्य नेता स्व. मनोहरभाई पटेल.

गुजरात राज्यातील खेडा जिल्ह्यातील नडियाद येथे ९ फेब्रुवारी १९०६ रोजी वडील बाबरभाई धरमदास पटेल आणि आई जीताबेन बाबरभाई पटेल यांच्या कुटुंबात मनोहरभाई पटेल यांचे जन्म झाले. आर्थिक विपन्नावस्थेमध्ये त्यांनी इयत्ता ४ थी पर्यंत घेतले. कुटुंबाची परिस्थितीत अत्यंत हलाकीची असल्यामुळे त्यांनी बालपणापासूनच कामाला सुरुवात केली.

मामाच्या ओळखीने त्यांनी मोहनलाल हरगोविंददास यांच्या कँम्पनी मध्ये त्यांनी नौकरी केले. त्याकाळात त्यांना ९६ रुपये वार्षिक वेतन मिळायचे. मनोहरभाईंच्या कार्य-कुशलतेमुळे हरगोविंददास अत्यंत प्रभावित झाले. त्यांनी मनोहरभाईंना ते तिरोड्याला घेऊन आले. इंदोरा ( तिरोडा ) शाखेच्या सहायक प्रबंधक पदावर नियुक्ती करण्यात आली.

मनोहरभाईंनी त्यांच्या नियुक्तीला योग्य न्याय देऊन तेथील व्यवस्थेत आमुलाग्र सुधारणा केली. कंपनीचे काम व्यवस्थित सुरू आहे असे वाटल्यानंतर ८ महिन्यांनी ते गोंदियाला स्थानांतरित झाले. तेव्हा त्या शाखेची जबाबदारी मनोहरभाईंकडे देण्यात आली. शाखेचे सुव्यवस्थापन, कार्यकुशलता दूरदर्शित, आणि सजगतेने शाखेला शिखरावर पोहचविणायचे काम त्यांनी केले.

यामुळे त्यांचे वार्षिक वेतन ९६ रुपयांहून २०० रुपये करण्यात आले. मामा जेठाभाई पटेल यांनी मोहनलाल हरगोविंददास यांची नोकरी सोडून माणिकलाल दलाल यांच्यासोबत भागिदारीप्रमाणे गोंदिया येथे तंबाखूचा व्यवसाय सुरू केला. मनोहरभाई यांनी मामाच्या व्यवसायाची जबाबदारी सांभाळली. प्रगतीच्या शिखरावर पोहचलेल्या विडी उद्योग द्वितीय महायुद्धाच्या काळात ( १९३९-४५ ) डबघाईस आला होता.

मात्र, मनोहरभाई महायुद्धाच्या काळात भागिदारांच्या लाख मनाईनंतरही जोखीम पत्करून जवळपास आठ महिने कोलकात्यात राहिले आणि व्यवसाय सुरू ठेवला. परिणामी, संपूर्ण ईशान्य भारतात विड्यांच्या विक्रीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात दररोज अडीच कोटी विड्यांचे उत्पादन आणि जवळपास ४५ हजार रुपये नफा होऊ लागला.

उद्योग व्यवसायात मग्न असतांनाही समाजासाठी काही करण्याची त्यांच्यातील तळमळ मात्र ढग ढगत होती. गोंदिया-भंडारा जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी धाड पड सुरु केली. १९२७ मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधींची गोंदिया येथे भेट. या भेटीदरम्यान महात्माजींच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी राजकारण स्वीकारले आणि कॉंग्रेससाठी काम करू लागले.

गोंदिया नगर परिषदेचे १९३७ साली पहिल्यांदा सदस्य झाले. आणि १९४६ पासून १९७० पर्यंत ते गोंदिया नगरपरिषदेचे अध्यक्ष राहिले. त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या २३ वर्षांच्या काळात गोंदिया शहर शून्यातून उभे राहिले. शहरात शाळा, दवाखाने, रस्ते व वीज इत्यादींची फार मोठी कामे झाली. नगर परिषद शाळेचे निर्माणकार्य त्यांच्या दानातून पूर्ण झाले.

त्यामुळे त्या शाळेला ‘मनोहर म्युनिसिपल हायस्कूल’ असे नाव देऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्याचप्रमाणे, त्यांच्या दानशीलतेचा गोंदिया शहरासह जिल्ह्यातील सूतिकागृह व दवाखान्यांना वेळोवेळी लाभ मिळाला. १९५२ साली त्यांच्या अपार लोकप्रियेतेमुळे ते पहिल्यांदा मध्यप्रदेश विधानसभेत निवडून गेले.

१९६२ साली पुनः गोंदिया मतदार संघातून महाराष्ट्र विधानसभेसाठी निर्वाचित झाले. त्यासोबतच त्यांचेवर तत्कालीन भंडारा जिल्हा कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देखील होती. त्याकाळात सर्वच बाबींचा अभाव असलेल्या पूर्व विदर्भात शिक्षण, आरोग्य, रस्ते व वीज यांसारख्या मुलभूत सुविधांची मोठ्या प्रमाणावर कामे करून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची पायाभरणी केली.

१९५८ साली ‘गोंदिया शिक्षण संस्थेची स्थापना करून अज्ञान व अंधारात आकंठ बुडालेल्या या क्षेत्रातील सर्वसामान्य लोकांना उच्च शिक्षणाच्या रूपाने प्रकाशाच्या वाटा मोकळ्या करून दिल्या. गोंदिया शिक्षण संस्थेच्या स्थापनेपूर्वी तत्कालीन भंडारा जिल्ह्यात उच्च शिक्षणाचा पूर्णपणे अभाव होता. जिल्ह्याचा साक्षरता दर ५ टक्क्यांपेक्षाही कमी होता.

मात्र, ‘गोंदिया शिक्षण संस्थेच्या स्थापनेमुळे गोंदिया-भंडारा जिल्ह्यात उच्च शिक्षणाचा प्रचार व प्रसार झपाट्याने झाला. आज गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याचा साक्षरता दर ९० टक्क्यांपेक्षाही अधिक आहे तो केवळ आणि केवळ स्व. मनोहरभाई पटेल आणि ‘गोंदिया शिक्षण संस्था यांमुळेच. परिणामी, ‘गोंदिया शिक्षण संस्थे’चे हजारो विद्यार्थी देश-परदेशात उच्च पदावर आणि मोठ्या पगारावर कार्यरत आहेत.

‘गोंदिया शिक्षण संस्थे’च्या माध्यमातून उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध झाल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना देश-परदेशात रोजगार मिळाला आहे. त्यांना मानाने जीवन जगण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. गोंदिया शिक्षण संस्था’ ही गोंदिया-भंडारा जिल्ह्यांतील ‘शिक्षण संस्थांची शिक्षण संस्था’ किंवा ‘जनक शिक्षण संस्था’ मानली जात आहे. आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

मनोहरभाईंनी ‘गोंदिया शिक्षण संस्थे’च्या माध्यमातून १९६०-६१ मध्ये जिल्ह्यात एकाच दिवशी २३ शाळा सुरू केल्या. पुढे १९६२ मध्ये त्या सर्व शाळा जिल्हा परिषदेला हस्तांतरित केल्या. त्याचप्रमाणे इटियाडोह, सिरपूर आणि पुजारीटोला या मोठ्या धरणांचे बांधकाम करून पूर्व विदर्भात सिंचन क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली. परिणामी, हजारो हेक्टर शेतजमीन ओलिताखाली आली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात सुगीचे दिवस आले.

तत्कालीन भंडारा जिल्ह्यात रस्त्यांचा संपूर्णतः अभाव असताना शेत-शिवारातील पानंदी आणि माळरानांवरून गोंदिया, आमगाव, तुमसर, भंडारा यांसारख्या मुख्य रस्त्यांच्या निर्माणासह ग्रामीण भागातील अनेक छोट्या-मोठ्या रस्त्यांच्या बांधणीस चालना दिली. ग्रामीण भागात सूतिकागृह, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांच्या उभारणीस प्रोत्साहन दिले. मनोहरभाईंनी आपल्या संपत्तीचा उपयोग गरीब आणि दलितांच्या उद्धारासाठी केला.

त्यांच्या औदार्याच्या साक्षीदार असलेल्या अनेक संस्था विदर्भात नांदत आहेत. आपल्या गुणांचा व संपत्तीचा समाजासाठी उपयोग करणारा मनोहरभाईंसारखा उदार पुरुष विरळाच. १७ ऑगस्ट १९७० रोजी अशा या महापुरुषाच्या निधनाने संपूर्ण जिल्हा हळहळला. जिल्ह्याने अभूतपूर्व शोक व्यक्त केला केला. उद्या स्व. मनोहरभाई पटेल यांची ११८ वा जयंती सोहळा साजरा होत आहे यानिमित्त हरित व शिक्षण क्रांतीचे जनक यांना अभिवादन.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: