Viral Video : बापाचा लेकराप्रती लाड बापाच्याच जीवावर बेतल्याचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडिओ नेमका कुठला आहे जरी समोर आले नसले तरी हा बापाला शिक देणारा हा व्हिडीओ आहे. एखाद्या समारंभ किंवा कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी गोळीबार करणे आता सामान्य झाले आहे. असे करून लोकांना एक प्रकारे आपला मोठेपणा दाखवायचा असतो. असे करणे गुन्हा असून सुद्धा लोक सर्रासपणे असे कृत्य करतात.
लग्नाच्या मिरवणुकीत डान्स करताना बंदूक दाखवणे किंवा गोळीबार करणे ही आता सामान्य बाब झाली आहे. मात्र हे करत असताना अनेक अपघात झाले आहेत, ज्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. असाच एक व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एखाद्या लग्न समारंभाचा वाटतो, जिथे गोळीबारादरम्यान मोठी दुर्घटना घडली. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक लहान मूल एका माणसावर गोळी झाडत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती हातात लोडेड पिस्तूल घेऊन लहान मुलासोबत बसलेली आहे. त्या व्यक्तीला त्या पिस्तूलमधून गोळीबार करायचा आहे, पण तो गोळीबार करू शकत नाही.
यानंतर ती व्यक्ती ते लोडेड पिस्तूल त्याच्या लहान मुलाच्या हातात देते. यानंतर जे घडले ते पाहून तुम्हाला धक्का बसेल. त्या मुलाच्या हातात पिस्तूल येताच त्याने ते खेळणे समजून पिस्तुलीचा ट्रिगर दाबतो आणि फायर झालेली गोळी त्या इसमाच्या पोटात लागते. गोळीबाराच्या धक्क्याने बालक जमिनीवर कोसळते.
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ कुठल्यातरी फंक्शनचा वाटतो, जिथे अचानक आनंदाचे वातावरण दु:खी झाले. जिथे लोक आनंदाने एकमेकांना भेटत होते. त्याचवेळी या गोळीबारानंतर लोकांमध्ये घबराट पसरली होती. आतापर्यंत 1.9 मिलियन लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. एका यूजरने या व्हिडिओवर ‘फादर ऑफ द इयर’ असे लिहिले आहे.