नांदेड – महेंद्र गायकवाड
बिलोली तालुक्यातील मिनकी येथील अल्पभूधारक शेतकरी राजेंद्र लक्ष्मण पैलवार(४३) व त्याचा शाळकरी मुलगा ओमकार राजेंद्र पैलवार (१६) या पिता-पुत्राने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना ९ रोजी गुरूवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली आहे.
मिनकी येथील अल्पभूधारक शेतकरी राजेंद्र लक्ष्मण पैलवार (४३) यांच्या कुटुंबात २ एकर जमीन आहे.त्या जमिनीवर साडे चार लाख रुपये महाराष्ट्र गग्रामीण बँक खतगाव शाखेचे कर्जासह काही खाजगी कर्ज होते.
शेतावर कर्ज व सततची नापिकी होत असल्याने मुलांचे शिक्षण खर्च बाबद नेहमी घरात आर्थिक ताण पडायचा.अशातच उदगीर येथे शिक्षणास असलेला
ओमकार राजेंद्र पैलवार वय (१६) हा संक्रात निमित्त गावाकडे आला होता.
तो दिनांक ८ रोजी बुधवारी दुपारी वडिलांना नविन कपडे व शालेय साहित्यसह नवीन मोबाईल घेण्यासाठी पैसे मागत होता. परंतु वडिलांनी कांही दिवस थांब पैसे नाहीत पैसे आले की घेऊन देतो असे म्हटल्यावर मुलगा नाराज झाला.वडिलांनी पैसे दिले नाही म्हणून त्याने नैराश्यात येऊन रात्रीच्या वेळेस शेतातील झाडास गळफास घेत आत्महत्या केली.
मुलगा घरी नसल्याचे पाहून वडिलांनी दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची शोधाशोध करीत शेताकडे गेले असता शेतातील लिंबाच्या झाडाला मुलगा गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पाहताच वडिलांनी मुलाने गळफास घेतलेली दोरखंड सोडून त्याचं दोरखंडाने त्याच झाडाला गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवलीआहे.या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.