Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीथडीपवनी अंबाडा रस्त्यावर भीषण अपघात - वाहन चालक जागीच ठार...

थडीपवनी अंबाडा रस्त्यावर भीषण अपघात – वाहन चालक जागीच ठार…

  • रस्ता रुद्दी नसल्याने सतत होतात अपघात
  • रस्त्या अरुंद असल्यामुळे ही तिसरी घटना
  • हा रस्ता रुद्ध करा अन्यथा आंदोलन करू समस्त नागरिकांचा संताप

नरखेड – अतुल दंढारे

नरखेड तालुक्यातील थडीपवनी अंबाडा रस्त्यावर ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला असून वाहनचालक जागीच ठार झाल्याची घटना काल रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली.
पेठमुक्तापुर येथील रहिवासी सुरेंद्र उर्फ जगू मोरे वय वर्ष चाळीस हा जलालखेडा येथील रमेश कांबळे यांचा ट्रॅक्टर सेन्टरिंगचे साहित्य घेऊन अंबाडा येथे आला होता थडीपवनी कडे परत जातांना अंबाडा येथील पांडुरंग भड यांचे शेताजवळील कॉर्नरवर त्याचा ट्रॅक्टर सरळ शेतामध्ये घुसला शेततातील मौसंबीच्या झाडावर अडल्याने तो जागीच ठार झाला.

बराच वेळ होऊन गाडी का घरी आली नाही म्हणून गाडीमालक रमेश कांबळे अंबाडा रस्त्याने पहावयास आले तर गाडी एका शेतात आढळली शेतात जाऊन पाहिले तर वाहन चालक मृतावस्थेत आढळुन आला तात्काळ त्यांनी पोलीसठाण्यात येऊन घटनेची माहिती देऊन घटनास्थळी पोलिसांना आणले पोलिसांनी पंचनामा करून कलम २७९,३०४ (अ)नुसार गुन्हा नोंद करून मृतदेह तपासणीसाठी जलालखेडा प्राथमिकआरोग्य केंद्र येथे आणण्यात आला.पुढील तपास ठाणेदार मनोज चौधरी,बिट जमादार मोरेश्वर चलपे दिनेश हिवसे,शेंडे करीत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: