Saturday, December 21, 2024
Homeराज्यबिलोली तहसील कार्यालयासमोर मटका व अवैध जुगाअड्डया विरोधात उपोषण…

बिलोली तहसील कार्यालयासमोर मटका व अवैध जुगाअड्डया विरोधात उपोषण…

नांदेड – महेंद्र गायकवाड

बिलोली शहरासह तालुक्यात मोठया प्रमाणात मटका व अवैध जुगार अड्डे चालू असल्याने या अवैध धंदयातून लाखो रुपयांची उलाढाल होत असून स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने हे अवैध धंदे जोमाने सुरु आहेत.हे अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत या मागणीसाठी बिलोली शहरातील सुरेश करोड नामक युवकांने दिनांक 2 ऑगस्ट पासून तहसील कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली आहे.नूतन पोलीस निरीक्षक हे अवैधधंदे पूर्णपणे बंद करतील काय ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान नूतन विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलिसांना कांही दिवसाचा कालावधी दिला असल्याने आता अवैध धंदेवाल्यांचे हि धाबे दानाणले आहेत.

बिलोली तालुक्यात व शहरात मटका व अवैध जुगारअड्डे जागोजागी चालू असून शहरात अनेक ठिकाणी मटक्याच्या बुक्या मोठया थाटात चालत आहेत. शहरातील मटकाकिंग वर अनेक गुन्हे दाखल असताना त्याला आतापर्यंत हदपार हि करण्यात आले नाही. त्यामुळे या मटकाकिंगचे मनोबल वाढले आहे. माझे कोणीही वाकडे करू शकत नाही अश्या तोऱ्यात हा मटकाकिंग वावरत असल्याचे बोलल्या जात आहे.शहरात व तालुक्यात अवैध जुगारअड्डे मोठया प्रमाणात चालू असून दोन दिवसापूर्वी हे जुगार अड्डे बंद करण्याचे पोलिसांनी सांगितल्या नंतरही बाहेरून बंद व आतून सर्व चालू असल्याने जुगार अड्डाचालक हे सामाजिक कार्यकर्ते व तक्रारकर्ते यांची दिशाभूल करीत आहेत.

या अवैध धंद्यामुळे गोरगरीब, मजूर, युवावर्ग, सुशिक्षित बेरोजगार हे कमी वेळात जास्त पैसे कमविण्याच्या नादात आपली रोजची कमाई या अवैध धंद्यात टाकत आहेत. अवैध जुगार अड्डयावर पर राज्यातून व इतर तालुक्यातून पत्ते खेळण्यासाठी कांही आंबटशोकीन येत आहेत. हे जुगार अड्डाचालक त्यांची सर्व सुविधा पूरवित आहेत. त्यामुळे या जुगार अड्डयावर दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. मटका चालक व जुगार अड्डाचालक यांची एकीकडे या अवैध धंद्यातुन दररोज लाखो रुपयांची कमाई होत असली तरी दुसरीकडे अनेकांचे संसार या अवैध धंद्यामुळे उध्वस्त होत आहेत.

अवैध जुगार अड्डयावर अनेक वाहने येत असून या जुगार अड्डयावर दारुसह मांसाहारी जेवण्याची सुविधा असल्याने दारू व जेवणावर ताव मारून वअनेकजण सुसाटवेगाने मद्यधुंद अवस्थेत आपली वाहने चालवीत आहेत.त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे करोड यांनी निवेदनात म्हण्टले आहे.मटका व अवैध जुगार अड्डयाविरोधात सुरेश करोड यांनी तहसीलदार व पोलीस प्रशासन बिलोली यांना निवेदन देऊन उपोषणास बसत असल्याचे कळविल्यानंतरही अवैध धंदे चालूच असल्याने सुरेश करोड यांनी या अवैध धंद्याविरोधात 2 ऑगस्ट पासून उपोषणास सुरुवात केली आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: