Sunday, December 22, 2024
Homeराज्यजिल्हा उद्योग केंद्राच्या अँमिनीटी झोनवरील अनाधिकृत इमारती विरुद्ध उपोषण : अनधिकृत इमारतीवर...

जिल्हा उद्योग केंद्राच्या अँमिनीटी झोनवरील अनाधिकृत इमारती विरुद्ध उपोषण : अनधिकृत इमारतीवर हातोडा पडणार..!

नांदेड – महेंद्र गायकवाड

शिवाजीनगर औद्योगिक वसाहत परिसरात जिल्हा उद्योग केंद्राच्या भुखंड आहे. हा भुखंड अॅमिनीटी झोन म्हणून आरक्षित आहे.पण जिल्हा उद्योग केंद्राच्या माजी संचालकांनी अधिकाऱ्यांशी संगनमत करून अनाधिकृत इमारत उभी केली आहे. या इमारतीला मंजुरी नाही , तरीपण बांधकाम सुरू आहे.

या बांधकामाच्या विरोधात शशिकांत पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.यामुळे 100 गाळेधारकांचे धाबे दणाणले असून दिडशे कोटींपेक्षा अधिक असलेल्या अनाधिकृत इमारतीवर हातोडा पडण्याची शक्यता आहे.

औद्योगिक वसाहतीत भुखंड उद्योगांसाठी आरक्षित आहेत.पण त्याठिकाणी शाळा , हॉटेल , कॉम्प्लेक्स उभारण्यात आले आले आहेत. हे सर्व नियमबाह्य असतांनाही कारवाई केली जात नाही.उलट महानगर पालिकेकडून अनाधिकृत बांधकाम परवानगी दिली जाते.यात लाखोंची उलाढाल झाली आहे.

जिल्हा उद्योग केंद्राच्या अॅमिनीटी झोन भुखंडावर बांधकाम करता येत नाही.पण जिल्हा उद्योग केंद्राची परवानगी नसताना महानगर पालिकेच्या नगर रचना विभागाच्या कांही अधिकाऱ्यांना हाताशी धरून इमारत बांधकाम सुरू केले आहे.

शशिकांत पाटील यांच्या उपोषणाने जिल्हा उद्योग केंद्राचे गैरव्यवहार उघड झाले असून महापालिकेचाही गोंधळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हासचिव शशिकांत पाटील गाढे यांनी अनेक निवेदने व तक्रारी करून सुद्धा वरिष्ठ अधीकाऱ्यांनी व संबंधित प्रशासनाने या प्रकरणी कसलीच कारवाई केली नसल्याने पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषणास सुरुवात केली.

असून अधिकाऱ्यावर राजकीय दबाव असल्याने अधिकारी काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.या उपोषणास बहुजन समाज पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष विक्की वाघमारे, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष, रयत क्रांतीचे जिल्हाध्यक्ष उत्तम पाटील धामणगावकर,

महात्मा फुले समता परिषद विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष अँड संघरत्न गायकवाड, मनसेचे सुभाष भंडारे, आरपीआय (आठवले )गटाचे अशोकराज कांबळे यांच्यासह विविध संघटनेने पाठिंबा जाहीर केला आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: