Wednesday, October 16, 2024
Homeराज्यशेतरस्ते बुडाले पाण्याखाली कारंजा (रम) येथिल शेतकरी त्रस्त...

शेतरस्ते बुडाले पाण्याखाली कारंजा (रम) येथिल शेतकरी त्रस्त…

पारस – सुदिरआप्पा कांबेकर

बाळापूर तालुक्यातील कारंजा(रमजानपूर) येथील लघूसंग्राहक प्रकल्पाखालील पाण्यामध्ये शेतकयांचे शेतरस्ते बुड़ाल्याने पर्यायी रस्ते मिळण्यासाठी २०१९ पासूनसंबंधीत विभागा कडे रितसर पत्रव्यवहाराव्दारे मागणी करूनही प्रशासनाकडून कुठलीही दखलघेण्यात नआल्यामुळे अखेर १५ऑक्टोबर पासून बाळापूर तहसील कार्यालयासमोर आमरणउपोषण करण्याचा ईशारा बाळापूर येथील विश्रामगृहात घेण्यात आलेल्या पत्रकार परीषदेत शेतकऱ्यांनी दिला आहे.

अकोला पाटबंधारे विभागाच्या वतीने कारंजारमजानपूर येथील पानखास नदीवर लघूसग्राहक प्रकल्पाची निर्मीती करण्यात आली आहे येथे मोठ्या प्रमाणात जलसाठा राहतअसून प्रकल्पाच्यापूर्व-पश्चिम बाजूला असलेले शेतकयांचे जुने
शोतरस्ते हे प्रकल्पातील पाण्याखाली बुडाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्तेच नसल्यामुळे शेतीची मशागत व शेतमालघरीआणणे कठीन झाले आहे.

प्रकल्पाच्या निर्मीती पासून म्हणाजे सन २०२४ याकालावधीत कारंजायेथील शेतकयांनी रस्ते पाण्याखाली बुडाल्यामुळे पर्यायी रस्तेमिळण्याबाबत अनेकदा निवेदनाद्दारे मागणी केली आहे.

परंतु अनेक दिवस होऊनही शेतकऱ्यां मागणीकडे प्रशासनाने लक्ष दिले नसल्यामुळे शेतात जाणे, मशागत करणे, शेतमालघरी आणणे ही कामे करण्यासाठी पर्यायी रस्ते च नसल्याने शेतकरी मोठ्चा प्रमाणात अडचणीतआले आहेत.

शासनाने या गंभीर समस्येकड़े गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे अन्यथा १५ऑक्टोबर पासूनतहसील कार्यालयबाळापूर समोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा पत्रपरिषदेच्या माध्यामातून शेतकयांनी दिलाआहे.

यावेळी मनोहर तायडे, रामराव नागे,देविदास बोळे, पवन नागे, गजानन तायडे, ज्ञानदेव भोजने यांच्यासह उमेशआप्पा भुसारी तसेच शेतकरी ग्राहक सहकारी संस्थेचे रमेश ठाकरे उपस्थीत होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: