अकोला – अमोल साबळे
यावर्षी झालेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर या अवकाळी पावसाला तीन महिने अकोला जिल्ह्यातील पीक विमा धारक शेतकऱ्यांना विमा मदत मिळाली नसून शेतकऱ्यांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून शेतकरी अद्यापही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.
ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे अशा शेतकऱ्यांना तुटपुंजी का होईना शासनाकडून मदत पीक विमा काढलेला आहे, अशा शेतकऱ्यांना हातात एक दमडी देखील मिळाली नसून संबंधित पीक विमा कंपनीच्या या कारभारावर शेतकरी वर्गाकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
शेतकरी मात्र नाराजी व्यक्त करीत आहे. अति पावसामुळे तुर, कापाशी व सोयाबीन पिकांची मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाने लागडव केली होती. त्यात यंदा प्रथमच अति पावसामुळे तुरीचे पीक जळाल्याने परिसरात तुरीचे पीक नष्ट झाले आहे. तसेच सोयाबीन व कपाशी पिकाचे सुद्धा नुकसान झाले असताना वारंवार विविध अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला असताना अतिवृष्टी असताना देखील भरपाई पीक विमानुकसान भरपाई विमाधारक शेतकऱ्यांना मिळालेली नाही.
यावर्षी अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झालेले असताना देखील पीक विमा धारक शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत त्वरित विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यात विमा जमा करावा अशी मागणी परिसरातील विमाधारक शेतकरी करीत आहेत