नांदेड – महेंद्र गायकवाड
शेतकऱ्यांना अनुदानावर कृषीविषयक सहाय्यभूत ठरणाऱ्या अनेक वस्तूंचे वाटप जिल्हा परिषदेच्या उपकर योजनेअंतर्गत होत आहे. यासाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषद कृषी विभागाने केले आहे.
जिल्हा परिषद उपकर योजनेअंतर्गत अनुदानावर कृषी साहित्याचा लाभ घेण्यासाठी अत्यंत सोपी पद्धत असून केवळ गटविकास अधिकारी यांच्या मार्फत अर्ज जिल्हा परिषद कृषी विभागाकडे सादर करणे आवश्यक आहे अशा अर्जाद्वारे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदानावर डीबीटी व कॅशलेस पद्धतीचा अवलंब करून ताडपत्री तीन एचपी पाच एचपी चे ओपन वेल सबमर्सिबल पंप संच पावर ऑपरेटेड चाफ कटर ट्रॅक्टर चलीत रोटावेटर सोयाबीन प्लांट बीज प्रक्रियेसाठी अनुदान शेतकरी उत्पादक कंपनी शेतकरी गट महिला बचत गट यांना सूक्ष्म प्रक्रिया उद्योग उभारणी व विस्तारणीकरण करण्यासाठी कृषी साहित्याचा लाभ पंचायत समिती स्तरावर देण्याचे प्रस्ताव मागविण्यात येत आहे याचा लाभ ग्रामीण भागातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.