गडचिरोली – ग्रामीण कृषी कार्यानुभव आणि कृषी औद्योगिक कार्यक्रमा अंतर्गत कृषी महाविद्यालय सोनापूर गडचिरोली येथील विद्यार्थ्यांनी हिरापूर गावात स्वतंत्र दिनी शेतकऱ्यांची प्रभातफेरी काढून जनजागृती केली. हा कार्यक्रम अकोला येथील डॉ.पंजाबराव कृषी विद्यापीठ व कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांनी कृषिदूत म्हणून राबविला.
महिलांच्या सक्षमीकरण योजनेची विदयार्थ्यांनी माहिती देऊन .महिलांच्या योजना व कृषी संवादिनी या पुस्तिकेचे वितरण गावकऱ्यांना करण्यात आले. यावेळी हिरापूरच्या सरपंच शालिनीताई कुमरे,उपसरपंच दिवाकर नीसार, मुख्याध्यापक साखरे,ग्रामरोजगार सेवक अशोक निसार आदीची.उपस्थिती होती.
हा कार्यक्रम कृषी महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता व सर्व प्राध्यापक वर्ग आणि कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर, गडचिरोली च्या सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी साहिल आत्राम,निखिल खोरेले, प्रीतिश गेडाम, विद्या वेलादी,आचल काटेंगे,श्रुती मडावी यांनी यशस्वी केला.