Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीचिंचोली (गणू) येथील शेतकऱ्यांची आत्महत्या...

चिंचोली (गणू) येथील शेतकऱ्यांची आत्महत्या…

पातूर – निशांत गवई

पातूर येथूनच जवळ असलेल्या चिंचोली गणू येथील शेतकरी शांताराम मोतीराम गव्हाळे रा चिंचोली गणू वय ५४ यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार १० एप्रिल रोजी उघडकीस आली आहे.

पोलीस पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार चिंचोली येथील शेतकरी यांच्या कडे जमीन असून सततच्या नापिकी व अवकाळी पावसाने झालेले नुकसान पाहून निराश होऊन आत्महत्या केल्याची चर्चा सूर होती.यांनी त्याच्या गट न ५५ मधील शेतात असलेल्या निंबच्या झाडाला दोरीने गळफास घेतला आहे.

या घटनेने परिसरात दुःखाचे वातावरण पसरले होते.यांच्या मागे पत्नी,एक मुलगा ,दोन मुली असा आप्त परिवार आहे.तसेच या बाबत पोलीस पाटील घटनेची माहिती देताच बाळापूर चे ठाणेदार अनिल जुमळे, पोलीस कॉन्स्टेबल शुद्धधन दाभाडे,दंदी,पोलीस पाटील सुनील अंभोरे यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी साठी पाठविण्यात आले..

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: