भंडारा – सुरेश शेंडे
राज्य सरकारतर्पेâ राबविण्यात येत असलेल्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ति योजना २०१९ अंतर्गत नियमीत कर्ज भरणार्या शेतकर्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. ज्या शेतकर्यांच्या कर्जखात्याचे आधार प्रमाणीकरण झाले त्या शेतकर्यांना अनुदान वाटप करण्यात आले आहे.
मात्र ज्या शेतकर्यांच्या कर्जखात्याचे आधार प्रमाणीकरण झाले नाही, अशा शेतकर्यांचे प्रोत्साहनपर अनुदान प्रलंबीत आहेत. अशा शेतकर्यांनी आपल्या कृषी कर्जखात्याचे आधार प्रमाणीकरण करावे, असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी केले आहे.
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ति योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर अनुदान योजनेसाठी पात्र ठरलेल्या व आधार प्रमाणीकरण झालेल्या १४ लाख ४० हजार कर्जखात्यासाठी ५२२२.०५ कोटी रुपयाचा लाभ मंजुर झाला असुन त्यापैकी १४ लाख ३८ हजार खातेदारांना ५२१६.७६ कोटी रकमेचा लाभ वितरीत करण्यात आला आहे. उर्वरीत खातेदारांना लाभ वितरीत करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.
या योजनेसाठी पात्र ठरुनही ३३ हजार २५६ खातेदारांना त्यांचे कर्जखात्याचे आधार प्रमाणीकरण झाले नसल्याने त्यांना लाभ मिळु शकला नाही. अशा शेतकर्यांनी तातडीने आपल्या कर्जखात्याचे आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे, तसेच बँक व्यवस्थापकांनी सुद्धा सबंधीत शेतकर्यांना आधार प्रमाणीकरणाकरिता सहकार्य करावे, असे आवाहन सुनील फुंडे यांनी केले आहे.