बाळापूर – सुधीर कांबेकर
गेली काही दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे खरीपातील सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग,ज्वारी आदी पिकांची स्थिती अत्यंतदयनीय झाली असून शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीरकरून शेतकयांना दिलासा द्यावाअशी मागणी आमदार नितीन देशमुख यांनी केली.
सोमवारी आमदार नितीन देशमुख यांनी शास्त्रज्ञांच्या चमूसह पारस येथील जोगलखेड, अड़ोसी,कड़ोसी, टाकळी खोज, सावरपाटी येथील शेतकऱ्यांच्या सोयाबीन,कापूस, तूर आदी पिकांची पाहणीकेली.
सतत २० ते २५ दिवसापासून पाऊस सुरू असूनअनेक शेतकयांच्या शेतातील सोयाबीनला फुले व शेंगाच लागल्या नाहीत तर काहींना लागलेल्या शेंगा अळ्यांनी फस्त केल्याचे गंभीरचित्र दिसूनआले,आमदार नितीन देशमुख यांच्या सोबत यावेळी डॉ. पंजाबरावदेशमुख कृषी विद्यापीठाचे डॉ. पी.जी. घाटोळ, जि. कृषी अधिक्षक शंकरआप्पा किरिणे,
कृषी विकास अधिकारी जाधव, गुणवत्तानियंत्रण निरीक्षक दांडगे जि. प.कृषी अधिकारी मिलींद जंजाळ, तहसीलदार वैभव फरतारे, तालुकाकृषी अधिकारी दत्तात्रय काळे,मंडळ कृषी अधिकारी शिवाजी जाधव, कृषी अधिकारी पं.स.सोनोने,
पं.स गटनेते योगेश्वर वानखडे, साहेबराव भरणे, आनंद बनचरे, भगवान पाटील, शंभू भरणे, माणिकराव चेंढाळणे, जयेंद्र सरदार, ग्रामसेवक कृषी सहाय्यक विट्टल वडतकार, महादेव गावंडे,नाना पाटील भरणे आदीसहबहूसंख्य शेतकरी उपस्थित होते.