Friday, November 8, 2024
Homeराज्यनागपुरात वेगळया विदर्भासाठी शेतकरी संघटना आक्रमक…

नागपुरात वेगळया विदर्भासाठी शेतकरी संघटना आक्रमक…

अकोला जिल्ह्यातील तमाम विदर्भ राज्य आंदोलन समिती चे कार्यकर्ते मा. सुरेशभाऊ जोगळे यांच्या नेतृत्वात विदर्भ राज्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात आले संविधान चौक नागपुर येथे उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले.

व संविधान चौक नागपुर रोड/रस्ता 1 तास बंद करून संपुर्ण पोलीस प्रशासनाची कोंडी करण्यात आली ऐक तासानंतर पोलिसांना आंदोलकांना ताब्यात घेण्यात यश आले. मा. वामनराव चटप साहेब व मा. प्रकाश पोहरे यांना अटक करण्यात आले व शेकडो कार्यकर्त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आले.

त्यामधे मा. सुरेशभाऊ जोगळे, गुलाबराव पाटील महसाये, प्रदीप डांगे, अरविंद तायडे , अमोल साव, निखिल भयाने, असे बरेच कार्यकर्ते मुर्तिजापूर तालुक्यातील अनेक विदर्भ राज्य आंदोलन समिती च्या आंदोलनात सामील झाले होते.

नागपुर शहरातील संविधान चौक पुर्णपणे बंद करून विदर्भ राज्यासाठी तीव्र आंदोलन पेटले व घोषणा बाजी करुण नागपुर येथे संविधान चौक गजबजून गेला. जय जय विदर्भ, विदर्भ राज्य आमच्या हक्वाचे नाहीं कोणाच्या बाप्पाचा अश्या घोषणा बाजी करण्यात आल्या.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: