Friday, September 20, 2024
Homeराज्यवाडेगावातील शेतकऱ्यांची नरकयातनेतुन सुटका...

वाडेगावातील शेतकऱ्यांची नरकयातनेतुन सुटका…

पिढ्यानपिढ्या सहन न होणाऱ्या नरकयातनेतुन शेतकऱ्यांची सुटका…

युवा नेता गोपाल प्रकाश राऊत यांच्या पुढाकाराने वघाडी नाल्या वरील पुलाचे काम पुर्ण…

वाडेगाव – वाडेगाव शेतशिवारातील वघाडी भाग दोन मधील साधारणतः २५० ते ३०० शेतकऱ्यांना शेतात जाण्यायेण्यासाठी जो कच्चा शेतररस्ता आहे त्यात वघाडी नाला आहे. हा नाला १५ ते २० फुट खोल आहे व पावसाळ्याच्या सुरुवातीलाच हा नाला तुडुंब भरून वाहत असतो. पेरणीसाठी बियाणे व खत आणि पेरणी यंत्रही जात नाही.

अनेक शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे उपयोग करून पाहिले पण सर्व प्रयत्न फसले गेले, अनेकदा याच ठिकाणी शेतकऱ्यांना आपल्या पशुधनाचे जीव याच ठिकाणी गमावतांना पाहिले. त्यामुळे या नाल्यावर सिमेंट कॉक्रीटचा पुल बांधने अंत्यंत आवश्यक होते.

वर्षानुवर्षे आमदार व खासदार तसेच विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींना तसेच वाडेगांव सर्कल चे जिल्हा परिषद सदस्य. तसेच प्रशासकीय अधिकारी यांना या परिसरातील शेतकऱ्यांनी सदर वघाडी नाल्यावर पुल बांधण्यासाठी साकडे घातले पण त्या सर्वांनी शेतकऱ्यांची फक्त थट्टा केली.

शेवटी सगळ्या शेतकऱ्यांनी वघाडी नाल्यावर पुल बांधण्यासाठी लोकवर्गणी जमा केली पण ती सुद्धा पुल बांधण्यासाठी अपुरी पडत असल्याने शेतकरी हताश झाले आणि २०० शेतकऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीचे ओबीसी नेते तथा अत्यल्प समाज संघटना वाडेगावचे अध्यक्ष गोपाल प्रकाशराव राऊत यांची भेट घेतली व आजपर्यंत वघाडी नाल्यावर पुल नसल्याने शेतकऱ्यांनी कशा नरकयातना सोसल्या हे सगळं गोपाल राऊत यांना सांगितले तसेच लोकप्रतिनीधी.

शासन व प्रशासनाने या शेतकऱ्यांची कशी थट्टा केली हेही सांगितले असता जमा झालेली लोकवर्गणी हि पुल बांधण्यासाठी अपुरी पडत आहे आणि हा पुल पावसाळ्यापूर्वी पुर्ण व्हायला हवा अशी बतावणी या सर्व शेतकऱ्यांनी केली असता. ओबीसी नेते गोपाल प्रकाशराव राऊत यांनी उर्वरित सर्व रक्कम मी स्वतः देईल असे कबूल केले आणि तात्काळ वघाडी नाल्यावर पुलाचे बांधकाम करुन दिले.

वाडेगावातील शेतकऱ्यांची पिढ्यानपिढ्या सहन न होणाऱ्या नरकयातनेतुन गोपाल राऊत यांच्या पुढाकाराने कायमची सुटका झाली. त्यामुळे वाडेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी वघाडी नाल्यावरील पुलाचे लोकार्पण हे कुठल्या आमदार व खासदार यांना न बोलावता गोपाल राऊत यांच्या हस्ते करण्याचे ठरवले. ठरल्याप्रमाणे आज दि २२ जुन २०२३ रोजी परिसरातील सर्व वघाडी भाग दोन मधील सर्व शेतकऱ्यांनी वघाडी नाल्यावरील पुलाचे उद्घाटन गोपाल राऊत यांच्या हस्ते केले.

व या शेतरस्त्यावर गोपाल राऊत यांचे आभार मानणारे फलक शेतकऱ्यांनी लावून गोपाल राऊत यांचे मनापासून आभार मानले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य हिम्मतराव घाटोळे हे होते तर वाडेगावातील प्रकाश कंडारकर, अनिल बारबुटे, नामदेव कराळे, रवी सरप, अरूण सरप, प्रल्हाद भटकर, प्रशांत पुंडकर, अनिल सरप, रूपेश कळंब, रूपेश भारसाकळे, मोहनसिंग ठाकुर, दिपक कळंब,

दत्ता सरप, अमोल भटकर, संतोष बारबुटे, संतोष चिंचोळकार, देवानंद जढाळ, शत्रुधन पोटदुके, संजय साबळे, धानोकार गुरूजी, सदानंद कारंजकर, गजानन वैतकार, डिगांबर कारंजकर, सुधाकर भारसाकळे, गजानन भारसाकळे, दिनकर भारसाकळे, जगत सरप, पांडुरंग कळंब, किसन कळंब, महादेव कळंब, सचिन धनोकार, अनवर भाई, मस्तान भाई, जिवन चिंचोळकार यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: