Monday, December 23, 2024
Homeशिक्षणअकोला जिल्हयातील शेतकऱ्यांना पिक विम्याची १०० टक्के रक्कम दिवाळीच्या आधी पिकविमा कंपनीने...

अकोला जिल्हयातील शेतकऱ्यांना पिक विम्याची १०० टक्के रक्कम दिवाळीच्या आधी पिकविमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी…शरद झामरे पाटील

अकोला जिल्हयात माहे जुन महिण्यापासुन ते आजपर्यत शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. म्हणुन अकोला जिल्हयातील शेतकऱ्यांना पिक विम्याची १०० टक्के रक्कम पिक विमा कंपनीने द्यावी संपूर्ण जिल्हयात परतीचा पाउस आणि जुन जुलै महिना सुरू असलेल्या पावसाने शेतकरी हवालदील झाला आहे.

तर यंदाही जिल्हयात ढगफुटी, नदी नाल्यांना पुर आल्यामुळे मोठया प्रमाणात शेती खरडून गेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाउस साचल्याने शेतकऱ्यांच्या घरी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. या पावसामूळे शेतकऱ्यांचे सर्व पिक पिवळ पडुन सोयाबीन, तुर, कापूस, तीळ, इतर आवश्यक पिकांचे नुकसान झाले आहे.

अकोला जिल्हयातील शेतकऱ्यांनी पिकविमा काढला आहे त्या शेतकऱ्यांना १०० टक्के पिकविम्याची रक्कम त्वरीत मिळून देण्यात यावी. जेणे करून शेतकऱ्यांना आधार मिळेल. पिकविम्याच्या कंपनीने जर सर्वे केला तर खरी परिस्थिती समोर येईल आणि त्यांना योग्य न्याय मिळून शेतकऱ्यांची दिवाळी साजरी होईल.

मात्र आज रोजी असे होतांना दिसत नाही शेतकऱ्यांचा वाली कोण? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. किमान दिवाळी पुर्वी काहीतरी मदत शेतकऱ्यांच्या पदरात टाकावी एवढी
रास्त अपेक्षा आपणाकडून व्यक्ती करीत आहो.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: