रामटेक – राजु कापसे
नागपूर जिल्हासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी अवकाळी पावसासह जोरदार वादळी वार्यासह गारपीटही झाली. त्सामुळे शेतकर्यांची पिके भुई सपाट होऊन मोठे नुकसान झाले. यात आंबा,संत्रा, मोंसबी, गहु, हरभरा आणि भाजीपाल्याचे मोठ्या प्रमानात नुकसान झाले.
शासनाने त्वरीत नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. दुष्काळाचे सावट असतांना मागील काही महीण्यात पाऊस झाल्यानंतर मोठ्या आशेने शेतकर्यांनी पिकाची पेरणी, लागवड केली होती. परंतू अवकाळी वादळासह गारपीटीने हाततोडांशी आलेली पीके चकणाचुर केली असुन शेतकर्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.
गारपीटीने शेतकर्यांच्या पिकांचे मोठे अतोनात नुकसान झाले असून शेतकर्यांनी शेतीसाठी बँकेतुन घेतलेले पीककर्ज कसे फेडावे असा प्रश्न शेतकर्यां समोर उभा राहीला. पारडी, कळमेश्वरसह काही तालुक्यातही गारपीट झाली.
कृषी उत्पन बाजार समिती कळमना धान्य बाजार समितीच्या आवारात उघड्यावर असल्यामुळे धान्य पूर्णता ओले झाले,. यामुळे धान्याची नासधूस झाली. अवकाळी पावसामुळे नागपुर जिल्हातीत प्रत्येक तालुक्या मधील प्रत्येक गावांना जोरदार फटका बसला आहे.
नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला आहे. की विदर्भात पुढील ३ दिवस पावसाचा अंदाज आहे. यात प्रामुख्याने पूर्व विदर्भासह अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपुर, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मुसळदार पाऊस होऊन शेतीचे फार नुकसान होण्याची शक्यता आहे.