बाळापुर – सुधीर कांबेकर
बाळापुर तालुक्यातील शेळद येथील शेतरस्ता व्याळा वाट मोकळा करुन देण्याबाबत शेळद येथील शेतकऱ्यांचा वतीने बाळापूर तहसील कार्यालयावर दुसऱ्यांदा आमरण उपोषणला सुरुवात करण्यात आली.
शेळद येथील शेतकऱ्यांचा वतीने तहसिल कार्यालय बाळापुर येथे शेत रस्ता मोकळ्या करण्याबाबत ९ नोंव्हेंबर रोजी २०२२ रोजी शेतरस्ता व्याळा पेठ मोकळ्या करण्याबाबत उपअधीक्षक भुमिअभिलेख कार्यालयाकडे मोजणीसाठी अर्ज सुध्दा केला होता.तहसील कार्यालय येथे उपोषणास बसलो होतो.
त्यावेळेस नायब तहसीलदार सैय्यद ऐहसानोद्दीन उपोषण सोडण्यासाठी आले असता.त्यांनी आम्हांला लेखी आश्वासन दिले की भुमि अभिलेख बाळापूर यांची मोजणीची कार्यवाही पुर्ण होतांच शेतरस्ता मोकळा करु परंतु त्यांनी आजपर्यंत रस्ता सुध्दा मोकळ्या केला नाही.
तसेच पटवारी मंडळअधिकारी यांना सुध्दा पाठविले नाही,आता पाऊस झाल्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी नाहकचा ञास सहन करावा लागत,त्यासाठी बाळापुर,तहसील कार्यालयावर दुसऱ्यादा उपोषण करण्याची पाळी आम्हा शेतकऱ्यांनवर आली असुन आमचा जो पर्यंत शेतरस्ता मोकळा होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतला जाणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी यावेळी दिला.
यावेळी रामसिंग पवार जयसिंग पवार बाबुराव अवचार अजाबराव गाढे बबन वानखडे भिकाजी पवार सुभाष गाढे यांचासह शेतकरी बांधव उपोषणाला बसले आहे. यावेळी शेळद चे माजी सरपंच सागर उपर्वट यांनी उपोषण मंडपास भेट दिली.