पातूर – निशांत गवई
पातूर तालुक्यातील स्टेट बँक सस्ती तर्फे शेतकऱ्यांचा पीककर्ज नूतनीकरण मेळावा सकाळी ९ वाजता स्टेटबँक सस्ती येथे आयोजित करण्यात आला आहे. तसेच नेहमी कर्जफेड करण्याऱ्या लाभार्थ्यांना सरकार कडून ५० हजार प्रोत्साहनात्पर अनुदान मिळाले आहे. त्यासाठी स्टेट बँक कडून त्यांचा पत्नीसमवेत सत्कार समारंभ आयोजित केला आहे.
स्टेटबँक ऑफ इंडिया शाखा सस्ती, अकोला महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत लाभार्थ्यांना ५० हजार सरकार कडून त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे.यामधेय प्रमोद काशीराम नागोलकार उमरा,रविंद्र गोरेलाल भोसले तूलंगा बु,दयाराम सीताराम मालठाणे सस्ती,हिरामण नारायण खंडारे सस्ती, राजेंद्र सुरेंद्र कवाळकर सस्ती,अतुल जगन्नाथ वाडेकर खेट्री,
गणेश अभिमान ठाकरे वाहळा,सारंगधर नारायण कीर्तने चतारी, कपिल दामोदर ढोरे चतारी, दीपक वामनराव कराळे दिग्रस या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखा व्यवस्थापक सचिन बुलाखे,पंचायत समिती सदस्य सूरज झडपे,मालठाने स्टेट बँकेचे अमोल भटकर,गजानन सुशिर, आदी बँकेचे कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.