पातुर – निशांत गवई
पातूर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री प्रक्रिया संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक साठी मतदान प्रक्रिया शाहबाबू उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज निवडणूक मतदान केंद्रावर गुरुवारी, 30 मार्च रोजी पार पडली सकाळी 8 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू होऊन दुपारी 4 वाजता संपली. त्यानंतर लगेचच मतदान झाले आणि सायंकाळी ५ वाजेपूर्वी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. सहा मतदार संघासाठी निवडणुक होती.
पैकी तीन मतदारसंघात निवडणूक झाली.प्रतिस्पर्धी पैनेल पराभूत झाले.तर तीन मतदारसंघातील उमेदवार अविरोध झाले.सर्वच सहा मतदार संघात सहकार पॅनलने बाजी मारली. सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले, त्यात सेवा सहकारी मतदार संघातून, अबुल हसन खान युसूफ खान, देशमुख पंजाबराव शेषराव, पाकदुणे सुदेश देविदास, पाचपोर जगदीश अभिमन्यू, राठोड मधुकर हिरामण,
लाहोळे पंजाबराव अवधूत, वैयक्तिक मतदार संघातून कचाले अरुण मारुती,ताले गजानन सुपराव ,इतर मागासवर्ग मतदार संघातून ताले श्रीकांत त्र्यंबक हे विजयी घोषित झाले, अनूसुचीत जाती जमाती मधून शंकर हांडे. भटक्या जाती विमुक्त जमाती मधून महादेव लक्ष्मण बांगर महिला प्रतिनिधी मतदारसंघात,ताले सौ.विजयाताई महादेव (महिला),
राठोड पंचफुला कसनदास (महिला) बिनविरोध निवड झाली. अशाप्रकारे ही निवडणूक सहकार पॅनलने मोठ्या मताने एकतर्फी जिंकली.पैनेलचे मार्गदर्शक तथा विजयी उमेदवारांनी जल्लोष केला. या निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी निवडणूक अधिकारी विनय बोराडे व त्यांचे सहकारी आर.आर घोळके, यांनी पार पाडली.