अकोला – अमोल साबळे
ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारेच्या सहाय्याने सर्व खातेदार शेतकऱ्यानी स्वतःच्या मोबाइलवरून आपल्या ७/१२ वर विविध पिकाची नोंदणी करता येणे शक्य झाले आहे.
त्यामुळे प्रत्येक सातबाराधारक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकाची नोदणी करूण महसुल विभाला सहकार्य करण्याचे असे आवाहन श्री सतीश कराड अध्यक्ष विदर्भ पटवारी संघ बाळापूर यांनी केले आहे.
महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्ट २०२१ पासून महाराष्ट्रात राज्यभर राबविण्यात येत आहे. या अपमध्ये आतापर्यंत सुमारे १.८८ कोटीपेक्षा अधिक शेतकन्यानी रेजिस्ट्रेशन केलेले आहे व आपल्या पिकाची नोंदणी केली आहे. खरीप हंगाम २०२३ पीक पाहणी आहे
नोंदणीसाठी ई-पीक पाहणीचे २.०.११ हे अपडेटेड व्हर्जन गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तरी सर्व खातेदार शेतकरनी नवीन व्हर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे. खरीप हंगामाच्या प्रत्यक्ष ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी करण्यासाठी १ जुलै २०२३ पासून सुरु करण्यात येत आहे.
तरी राज्यातील सर्व शेतकरी बंधु-भगिनींना अवाहन करण्यात येते कि त्यांनी खरीप हंगामा २०२३ साठी दिलेल्या कालावधीमध्ये आपली ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी जेणे करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास अडचण येणार नाही. असेही सतीश कराड अध्यक्ष विदर्भ पटवारी संघ बाळापूर यांनी सांगितले.