Monday, December 23, 2024
Homeराजकीयशेतकरी शेतमजुरांनी आपल्या हक्कासाठी एकत्रित यावे! प्रशांत डिक्कर यांचे आवाहन...

शेतकरी शेतमजुरांनी आपल्या हक्कासाठी एकत्रित यावे! प्रशांत डिक्कर यांचे आवाहन…

पंचाळा येथे शेतकऱ्यांची बैठक संपन्न.

संग्रामपूर / विदर्भात वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी शेतकरी शेतमजुरांनी एकत्रितपणे लढा उभारुन आपल्या न्याय हक्कासाठी संघटीत यावे असे आवाहन स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी पंचाळा येथिल पार पडलेल्या बैठकीत बोलतांना केले आहे. नैसर्गिक संकटे, उत्पादनात घट आणि यामधून नैराश्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालानुसार २०२० मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये १८% वाढ झाली आहे.

यामध्ये दुर्देव म्हणजे महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झालेल्या आहेत. शेती व्यवसयासाठी सरकारी योजना, विविध बाबतींमध्ये सवलती असे असतांना देखील शेतकरी आणि शेतमजूर यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ होत आहे. हे केंद्र व राज्यातील सरकारचे अपयश असल्याची खंत यावेळी प्रशांत डिक्कर यांनी बोलतांना व्यक्त केली.

राज्यातील काही शेतकरी स्वत:ची जमीन असलेले आहेत आणि ते त्याची लागवड करतात, तर शेतमजूर म्हणजे ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही आणि त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत इतरांच्या शेतात काम करतात. त्यामुळे शेतमजूरही आत्महत्येचे बळी ठरत आहेत. हे आलेले संकटे रोखण्यासाठी आम्ही धडपडतो आहे.

याकरीता शेतकरी शेतमजुरांनी संघटीतपणे साथ द्यावी अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली. या बैठकीला स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष विजय ठाकरे, मंगेश खानझोड, संतोष म्हसाड, विजय खानझोड, नंदू पाटील निलेश खानझोड, रवि खानझोड, ज्ञानेश्वर खानझोड, युवराज पाटील, अंकित अहीर, बाळकृष्ण पाटील , विलास पाटील, सुनिल पाटील, गजानन खानझोड, भगवान पाटील, यांच्या सह बहुसंख्य गावातील नागरिक उपस्थित होते. तसेच पंचाळा येथिल शेतकऱ्यांच्या वतीने आदरणीय प्रशांतभाऊ डिक्कर यांचा सत्कार करण्यात आला..

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: