• लोकप्रतिनिची मात्र बघायाची भूमिका….
• संबंधित विभागाचे अधिकारी वर्ग देतात उडवा उडी चे उत्तर शेतकरी झाले हतबल…
वृत्तसेवा – अतुल नवघरे
लाखपुरी : ता. १७ , मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन कडुन २०२२ मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येत आहे.
त्या करिता शासनाकडुन आधार प्रमाणीकरण (e-KYC) सहज व सोपे होण्यासाठी सेतु मध्ये केवायसी करण्याकरिता प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये नाव असल्यास कागदपत्रे घेवून सेतु व आपले सरकार सेवा केंद्र (ASSK) मध्ये जावून प्रमाणीकरण (e-KYC)करून घेता येते. सदर याद्या संकेतस्थळावर माहिती अपलोड करण्यात आल्या आहे.
तालुक्यातील लाखपुरी सह लाखपुरी सर्कल मधील लाखपुरी , दातवी , लाईत , खुदावंतपुर , रसलपुर , रेपाटखेड , मंगरुळकाबे , जांभा ,दुर्गवाडा , सांगवी वाघझडी सह लाखपुरी सर्कल मधील खुप मोठ्या प्रमाणात शेतक-यांचे नाव आधार प्रमाणीकर यादीत आहेत परन्तु शेतकऱ्यांनी केवायसी करूनही सदर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही.
दिवाळी असूनही सुद्धा पैसे जमा न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी शेवटी निराशाच आली आहे .परिसरातील लोकप्रतिनिमात्र बघायची भूमिका घेत आहे. शेतकऱ्यांचा वाली आहे कि नाही असा प्रश्न शेतकरी बांधवाना पडला आहे. तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याचे पैसे का आली नाही.
याची पडताळणी करून शेतकऱ्यांना त्यांचे पैसे खात्यामध्ये जमा करण्याकरिता काय उपाय योजना करते या कडे तालुक्यातील लाखपुरी सह लाखपुरी सर्कल मधील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
लाखपुरी व लाखपुरी सर्कल व तालुक्यातील मधील सन २०२२ मधील नैसर्गिक आपत्ती. शेतकऱ्यांनी केवायसी करूनही खात्यात पैसे जमा झाले नाही.तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन प्रश्न मार्गी लावावा.
सौ. मिनल चं.नवघरे (माजी. पंचायत समिती सदस्य लाखपूरी
मी केवायसी करून सुद्धा माझ्या खात्यात सदर रक्कम जमा झाली नाही. माझी दिवाळी सुद्धा अंधारात गेली आहे . तरी शासनाने सदर रक्कम खात्यामध्ये जमा करण्याकरिता सहकार्य करावे.
शंकर अंभोरे ( शेतकरी लाखपुरी )
माझे शेत दातवी व शेलु नजीक येथे असुन माझ्या दोन्ही शेताची केवायसी करून सुद्धा नुकसानाचे पैसे दाखवलेली रक्कम माझ्या खात्यात जमा झाली नाही. आणि कोणाला विचारलं तर कोणी सांगायला सुद्धा तयार नाही. हे पैसे जमा होणार की नाही हा प्रश्न मला पडला आहे.
मनोहर अवघाते ( शेतकरी – दातवी ,शेलु नजीक )