रामटेक – राजु कापसे
पवनी वनपरिक्षेत्र (बफर झोन) हद्दीत येणाऱ्या देवलापार जवळील डोंगरताल गावात सकाळी शेतात गेलेल्या शेतकऱ्यावर लपून बसलेल्या वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना (२७ एप्रिल) सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.
सरपंच यांनी दिलेल्या माहितीनुसार,डोंगरताल येथील रहिवासी विठ्ठल कोदुजी वरखडे वय ६४ वर्ष. हे सकाळच्या सुमारास आपल्या गावातील शेतात शेतकाम करण्याकरिता गेले होते.
शेताच्या कडेला लपून बसलेल्या एका पट्टेदार वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. अचानक वाघाने केलेल्या हल्ल्याने विठ्ठल घाबरून गेले.व आरडाओरडा करू लागलेत. यातच वाघ शेतकऱ्याला गंभीर जखमी करून पडून गेला. झिंझेरिया येथील काही शेतकऱ्यांनी जखमीला ग्रामीण रुग्णालय देवलापार येथे नेले.
घटनेची माहिती जखमीने गावातील लोकांना दिली.गावातील लोकांनी तात्काळ घटनास्थळ गाठले.मात्र जखमीला ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेल्याने गावकऱ्यांनी ग्रामीण रुग्णालय गाठले.व वनपरिक्षेत्र कार्यालय पवनी यांना घटनेची माहिती देण्यात आली.वनविभागाची टीम रुग्णालयात पोहचली व पुढील उपचारासाठी जखमीला मेडिकल कॉलेज नागपूर येथे पाठविण्यात आले.
एकाच आठवड्यात घडल्या दोन घटना.
दि.२४ एप्रिल रोजी गोविज्ञान अनुसंधान केंद्राच्या मागच्या बाजूला सुनील चौधरी नावाच्या एका गुराख्यावर वाघाने हल्ला करून त्यास गंभीर जखमी केले होते.
परत तीन दिवसानंतर डोंगरताल येथील विठ्ठल वरखडे यांना वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले.यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वाघाची तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.