Monday, December 23, 2024
Homeशिक्षणबाळापुर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सीनियर वायरमन बॅचला निरोप...

बाळापुर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सीनियर वायरमन बॅचला निरोप…

बाळापूर – सुधीर कांबेकर

बाळापूर आय.टी.आय. येथील दिनांक 17 ऑगष्ट रोजी वायरमन सीनिअर बॅच चे प्रशिक्षण पूर्ण झाले असून त्या निम्मित विद्यार्थ्यांनी निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून संस्थेचे प्राचार्य आर. डी. धोत्रे , यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले सीनियर बॅचचे शिल्प निदेशक तसेच गटनिदेशक एस. जी. तायडे , यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाला नृपनारायण , काळे , वाघ , खान , इत्यादी मान्यवर शिक्षक उपस्थित होते.

यावेळी निरोप कार्यक्रमां मध्ये संस्थेचे प्राचार्य धोत्रे म्हणाले की विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण उत्कृष्टपणे पूर्ण केले असून यावर्षी लोकसभा निवडणुकीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा तसेच प्रत्येक बुथवर जाऊन फिटिंग सुद्धा विद्यार्थ्यांनी केली तसेच यावेळी शिल्प निदेशक शिक्षक तायडे यांनी बोलताना असे म्हटले की, माझ्या 28 वर्षाच्या सेवेमध्ये अत्यंत प्रामाणिक व मेहनती वायरमन बॅच म्हणून 2022 ते 2024 ही दोन वर्ष चीबॅच माझ्या आयुष्यभर लक्षात राहील ही विशेष! मा. व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी शरदचंद्रजी ठोकरे , यांनी विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगार मिळावा यासाठी आटोकाट प्रयत्न करावे तसेच आपण आपले काम करत राहावे कोणी देखील ना देखे ईश्वर देख रहा है, या तत्त्वाने आपले काम पूर्ण करत राहावे व भविष्यातील भावीतव्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: