Monday, December 23, 2024
Homeराज्यगटशिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के यांचा निरोप समारंभ...

गटशिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के यांचा निरोप समारंभ…

संतोष सोनटक्के उत्तम प्रशासक – सभापती संजय डांगोरे

नरखेड – अतुल दंढारे

काटोल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संतोष शांतारामजी सोनटक्के यांची भिवापूर येथे बदली झाल्यामुळे जि.प.शिक्षक व कर्मचारीवृंदातर्फे ‘निरोप समारंभ’ शिक्षक प्रशिक्षण सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं. स.सभापती संजय डांगोरे, सत्कारमूर्ती गटशिक्षणाधिकारी भिवापूर संतोष सोनटक्के तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य सलील देशमुख, जि.प.सदस्य समीर उमप, जि.प.सदस्या पुष्पाताई चाफले, उपसभापती निशिकांत नागमोते,

पं.स.सदस्य धम्मापाल खोब्रागडे, पं. स.सदस्या अनुराधाताई खराडे, चंदाताई देव्हारे, अरुण उईके,लताताई धारपुरे, गटशिक्षणाधिकारी काटोल नरेश भोयर, गटशिक्षणाधिकारी नरखेड विशालसिंग गौर प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी, संतोष सोनटक्के यांचा अतिथींच्या शुभहस्ते शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह, मानपत्र,पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात सभापती संजय डांगोरे म्हणाले,संतोष सोनटक्के उत्तम प्रशासक आहे.सर्व शिक्षकांना सोबत घेऊन त्यांनी विद्यार्थी गुणवत्ता विकासाचे काम केले आहे.

म्हणून काटोल तालुका शिक्षण क्षेत्रात अव्वल राहिलेला आहे.त्यांच्या काळात तालुक्यातील शिक्षक अद्यावत झाले.व विविध कौशल्य आत्मसात करून विद्यार्थी घडविण्याचे काम केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता तालुक्यातील सर्व शिक्षक व केंद्रप्रमुख यांनी अथक परिश्रम घेतले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: