मुर्तिजापूर विधानसभेसाठी दोन तीन पक्षात इच्छुकांची मोठी रांग लागली आहे. सर्वात जास्त भावी उमेदवार महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पक्षात असल्याने इतर पक्षात मात्र मोजकेच नावे ऐकायला मिळत आहेत. त्यापैकी भाजपला टक्कर देणारा एकमेव पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी या पक्षातही सध्या तीन-चार नावाची चर्चा आहे. त्यापैकी मागील निवडणुकीत भाजपला टक्कर देणारी महिला उमेदवार प्रतिभाताई अवचार व तरुण उद्योजक कश्यप जगताप यांच्यासह शहरातील भैय्यासाहेब तायडे, सुनील सरदार यांचीही नावे चर्चेत आहे. मात्र मतदारसंघात वंचितचा कोणता उमेदवार असणार हे जर निश्चित नसलं तरी इतर पक्षातील भावी उमेदवार जसे कामाला लागले तसे वंचितचे सध्या मतदारसंघात फिरत नाहीत जो कोणी वंचितच्या नावावर फिरत आहे, तो वंचितचा उमेदवार नसून बाळासाहेबांना प्रभावित करण्यासाठी फसवे प्रयोग करीत असल्याचे निदर्शनात आले आहे. तर निवडणूक जाहीर होण्यापूर्वी उमेदवाराची निवड करतील, त्यानंतरच मतदार संघात खरा उमेदवार लोकांना कळेल.
मागील निवडणुकीत भाजपला जोरदार टक्कर देणारी वंचितची महिला उमेदवार प्रतिभाताई अवचार ह्या या मतदारसंघात लोकप्रिय आहेतच शिवाय त्यांना या मतदारसंघाचा दांडगा अनुभव आहे जर यावेळेस प्रतिभा अवचार यांना वंचित कडून उमेदवारी मिळाली तर त्या भाजपाला चांगले आव्हान देऊ शकतात. मागील निवडणुकीत त्यांनी भाजपचे मते आपल्याकडे वळविले होते. मतदार संघात काम करणारी महिला म्हणून त्यांची ओळख आहे. मात्र यावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, त्यांनाच उमेदवारी मिळणार हे आतापासून सांगणे कठीण आहे.
दुसरे उमेदवार म्हणजे अकोल्याचे तरुण उद्योजक कश्यप जगताप हेही मागील निवडणुकीत वंचित कडून इच्छुक होते. मात्र ऐन वेळेवर त्यांना बाळासाहेबांनी थांबण्यास सांगितले होते मात्र यावेळेस त्यांची वर्णी लागू शकते. त्याचं माध्यमिक शिक्षण मुर्तिजापूर शहरात झाल्याने त्यांची शहरातील सर्व जाती धर्मातील लोकांसोबत चांगलीच ओळख आहे. कश्यप जगताप यांची तरुण उद्योजक म्हणून अकोला जिल्ह्यातच नव्हे पश्चिम विदर्भात चांगले प्रसिद्ध आहेत. विशेष म्हणजे त्यांची मूर्तिजापूर तालुक्यात व बार्शीटाकळी तालुक्यात आणखी वेगळी ओळख आहे. त्यांचे वडील या दोन्ही तालुक्यात ग्राम विस्तार अधिकारी असल्याने त्यांची एक वेगळी ओळख आहे. हे बौद्धच नव्हे तर इतर समाजातील लोकांनाही आपल्याकडे आकर्षित करू शकतात अशी क्षमता या उमेदवारांमध्ये आहे. विशेष म्हणजे तरुणांना रोज्गाची संधीही ते उपलब्ध करू शकतात अश्या होतकरू उमेदवाराला जर पक्षाकडून तिकीट मिळाले तर ते संधीचे सोने करू शकतात.
तिसरे नाव हे मूर्तिजापूर येथील वंचित चे तालुकाध्यक्ष सुनील सरदार यांचे नाव चर्चेत आहे. ते मुर्तिजापूर येथील स्थानिक असून पक्षासाठी ते गेल्या तीन ते चार वर्षापासून पक्षाची धुरा सांभाळत आहे. त्यांनी तालुक्यात पक्ष वाढीसाठी चांगली भरीव कामगिरी केली असल्यामुळे त्यांना अम्पूर्ण तालुक्यात ओळखतात. जर यावेळी त्यांना उमेदवारी मिळावी असाही येथील स्थानिक जनतेचा सूर आहे. मात्र ऐनवेळी बाळासाहेब यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांना उमेदवारी मिळाली तर वरील तीनसह अनेक इच्छुक उमेद्वारच्या इच्छेवर विरजण पडू शकते.
मूर्तिजापूर मतदारसंघात काही भावी उमेदवारांनी आतापर्यंत पैशाचा पाऊस पाडून लोकांना आपल्याकडे जरी आकर्षित केले असेल मग सामान्य उमेदवाराने निवडणूक लढवायची नाही काय?. या मतदारसंघात निवडणूक लढवायची असेल तर बाप जाद्याची चार-पाच एकर शेती विकावी लागणार तेव्हाच निवडणुकीला तुम्ही उभे राहू शकता असं चित्र सध्या मतदारसंघात आहे. मात्र वंचित असा पक्ष आहे की ज्याला एवढा पैसा खर्च करायची गरज नाही. तरीपण गाडी, घोडे, बॅनर, कार्यकर्ते हे सांभाळण्यासाठी पैसा लागतोच त्यामुळे यावेळी ज्याची पैसा खर्च करण्याची ताकद त्यांच्यामध्ये असेल त्यालाच बाळासाहेब उमेदवारी देतील?…