Friday, November 22, 2024
Homeराज्यअमरावती तालुक्यात कठोरा गांधी व नांदगाव पेठ येथे रास्त भाव दुकान; संस्थांनी...

अमरावती तालुक्यात कठोरा गांधी व नांदगाव पेठ येथे रास्त भाव दुकान; संस्थांनी अर्ज करण्याचे पुरवठा अधिकाऱ्यांचे आवाहन…

अमरावती – दुर्वास रोकडे

अमरावती ग्रामीण तालुक्यातील कठोरा गांधी व नांदगाव पेठ या दोन गावांमध्ये नवीन रास्त भाव दुकाने सुरू करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. नवीन रास्त भाव दुकानांसाठी इच्छुक संस्था व गटांनी 27 ऑगस्टपूर्वी अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांनी केले आहे.

निवडीचा प्राथम्यक्रम: नवीन रास्तभाव दुकानांसाठी संस्थेची निवड करताना ग्रामपंचायत किंवा तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था, संस्था नोंदणी अधिनियमांतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था किंवा न्यास यांना अर्ज करता येईल. याच प्राथम्यक्रमानुसार रास्तभाव दुकान परवाने मंजूर केलेल्या दुकानांचे व्यवस्थापन महिला किंवा त्यांच्या समुदयाव्दारे करणे आवश्यक राहिल.

अर्जाची प्रक्रिया: इच्छुक संस्था, गटांना विहित नमुन्यातील अर्ज संबंधित तहसिल कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेदरम्यान प्राप्त होऊन दाखल करता येतील. अर्जाची विक्री व स्वीकृत करण्याची मुदत दि. 27 ऑगस्टपर्यंत राहील.

त्यानंतर प्राप्त अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. रास्त भाव दुकानाचा परवाना मंजूर करण्याची कार्यवाही जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती करेल. रास्त भाव दुकानाचे अर्ज 100 रूपये चलानाव्दारे लेखाशीर्ष 4408 व्दारे भरणा करून संबंधित तहसिल कार्यालयामधून प्राप्त करून घेता येईल, असे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी कळविले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: