Saturday, November 23, 2024
Homeराजकीयविदर्भात फडणवीसांना नाकारलं?...अतिशोयोक्ती अंगलट आली?...

विदर्भात फडणवीसांना नाकारलं?…अतिशोयोक्ती अंगलट आली?…

राज्याच्या चाणक्याला हि निवडणूक चांगलीच अंगलट आल्याचे सध्या चित्र दिसत आहे. पैश्याने काहीही होते हे सध्या राज्याचे राजकीय चित्र आहे, मात्र मतदार हाच राजा असतो हे आता या निवडणुकीत सिद्ध झाले आहे. नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीने भारतीय जनता पार्टीला जोरदार धक्का दिला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबोले यांनी भाजपाचे उमेदवार नागोराव गाणार यांचा पराभव केला आहे.

सोबतच देवेंद्र फडणवीस यांचे खास जवळचे अकोल्याचे डॉ.रणजीत पाटील यांचाही पराभव आता निश्चित दिसत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. आता केवळ १८४०३ मतांची मोजणी शिल्लक आहे. ती सुरु असून सध्या सुरू असून ही मतमोजणी पुर्ण झाली की, अवैध ठरविण्यात आलेल्या मतांना 1 लाख 2 हजार 403 मतांमधून वजा केल्या नंतरच वैध मतांनी विजयी होण्यासाठीचा मतांचा कोटा निश्चित करण्यात येणार आहे.

दोन्ही उमेदवारांपैकी एकही उमेदवार निर्धारित मतांचा कोटा पूर्ण करण्याची नसल्या मुळे ही बाद फेरी सुरू करण्यात येईल.यामुळे मतमोजणी उशिरा रात्रभर चालण्याची शक्यता आहे. दुसऱ्या पसदीच्या मतांची मोजणी सुरु होईल. त्या नंतर निर्धारित मतांचा कोटा जो उमेदवार पूर्ण करेल त्याला विजयी घोषित करण्यात येईल, अत्यंत क्लिष्ट अशी मतमोजणी प्रक्रिया आहे. त्यामुळे अंतिम निकाला जाहिर करण्यात आता वेळ लागणार आहे.

नागपूरमधील विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नागपूरच्या स्थानिक राजकारणावरून समर्पक चारोळी शेअर करत भाजपाला खोचक टोला लगावला आहे. त्यांनी भाजपाचा उल्लेख ‘कमळाबाई’ असा केला असून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही टोला लगावला आहे. मिटकरींनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, “नागपूरकर ‘गाणार’… आज ‘कमळाबाई’ जाणार… बावन’कुळां’चा उद्धार… काही दिवसांत होणार… संघाच्या बागेत देवेंद्रजींची दरी… नितीनजी ठरतील का भावी “गड”करी?”

तिसरी फेरी
अमरावती पदवीधर मतदार संघ

धीरज लिंगाडे 34 हजार 923काँग्रेस
रणजित पाटील 33 हजार 758 भाजप
चौथी फेरी सुरू आहे
लिंगाडे 7232
पाटील 6473
लिंगाडे 43,340
पाटील 41,027

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: